India vs Bangladesh 1st ODI Live Update : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विश्रांतीवर गेलेले सीनियर खेळाडू बांगलादेश दौऱ्यातून भारतीय संघात परतले आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल यांनी वर्ल्ड कपनंतर न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती घेतली होती. आज हे तिघेही बांगलादेशविरुद्धची पहिली वन डे मॅच खेळत आहे. विश्रांतीच्या काळात रोहितने फिटनेसवर अधिक लक्ष दिल्याचे फोटो व्हायरल झाले होते आणि त्याने BKCच्या मैदानावर कसून सरावही केला होता. आज रोहित ताजातवाना होऊन मैदानावर उतरला आणि मोठा विक्रम नोंदवला.
२०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होतेय, कारण संघातील सीनियर खेळाडू परतले आहेत. भारत-बांगलादेश यांच्यातली पहिली वन डे मीरपूर येथे आज खेळवली जात आहेत. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मालिकेपूर्वी रवींद्र जडेजा, यश दयाल यांनी माघार घेतली आणि काल मोहम्मद शमीला माघार घेतल्यानं भारतासमोर तगडा संघ मैदानावर उतरवण्याचे ध्येय आहे. त्यात रिषभ पंतनेही वन डे मालिकेतून माघार घेतली. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात रिषभच्या पाठीच्या दुखण्याने डोकं वर काढलं होतं. बीसीसीआयने ट्विट करून माहिती दिली की, रिषभ पंत वन डे मालिकेत खेळणार नाही, तो कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असेल. अक्षर पटेल यालाही दुखापतीमुळे पहिल्या वन डेत खेळता येणार नाही.
रोहित व शिखर धवन ही नियमित जोडी सलामीला मैदानावर उतरली आणि लोकेश यष्टींमागे दिसणार आहे, कुलदीप सेनने आजच्या सामन्यातून पदार्पण केले आहे. रोहित-धवनने संयमी सुरुवात केली आणि चौथ्या डावात बांगलादेशने फिरकीपटू मेहिदी हसनला गोलंदाजीला आणले. त्याने सहाव्या षटकात भारताला पहिला धक्का दिला. धवन रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात ७ धावांवर त्रिफळाचीत झाला. रोहित व विराट कोहली यांनी चांगली खेळी केली होती, परंतु शाकिब अल हसनने एकाच षटकात दोघांना बाद केले. त्याने रोहितला ( २७) त्रिफळाचीत केले, तर तिसऱ्या चेंडूवर विराटचा ( ९) लिटन दासने अफलातून झेल घेतला. भारताचे आघाडीचे तीनही फलंदाज ४९ धावांवर माघारी परतले.
वन डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहितने सहावे स्थान पटकावताना मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले18426 - सचिन तेंडुलकर12344 - विराट कोहली11221 - सौरव गांगुली10768 - राहुल द्रविड 10599 - महेंद्रसिंग धोनी9378* - रोहित शर्मा9376 - मोहम्मद अझरुद्दीन
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"