IND vs BAN 1st ODI : Virat Kohli ला 'शॉक' लागला, लिटन दासने अफलातून झेल घेतला! शाकिबच्या ३ चेंडूंत २ विकेट्स, Video

India vs Bangladesh 1st ODI Live Update : रोहित व शिखर धवन ही नियमित जोडी सलामीला मैदानावर उतरली आणि लोकेश यष्टींमागे दिसणार आहे, कुलदीप सेनने आजच्या सामन्यातून पदार्पण केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 12:39 PM2022-12-04T12:39:49+5:302022-12-04T12:41:23+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN 1st ODI Live Update :  Sensational catch by Litton Das! Rohit Sharma (  27) and Virat Kohli ( 9) dismissed in shakib al hasan single over, Video | IND vs BAN 1st ODI : Virat Kohli ला 'शॉक' लागला, लिटन दासने अफलातून झेल घेतला! शाकिबच्या ३ चेंडूंत २ विकेट्स, Video

IND vs BAN 1st ODI : Virat Kohli ला 'शॉक' लागला, लिटन दासने अफलातून झेल घेतला! शाकिबच्या ३ चेंडूंत २ विकेट्स, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh 1st ODI Live Update : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विश्रांतीवर गेलेले सीनियर खेळाडू बांगलादेश दौऱ्यातून भारतीय संघात परतले आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल यांनी वर्ल्ड कपनंतर न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती घेतली होती. आज हे तिघेही बांगलादेशविरुद्धची पहिली वन डे मॅच खेळत आहे. पण, रोहित व विराटला अपयश आले. शाकिब अल हसनने तीन चेंडूंत या दोघांनाही माघारी पाठवून भारताची अवस्था ३ बाद ४९ धावा अशी केली. लिटन दासने ( Litton  Das) एक्स्ट्रा कव्हरवर घेतलेला झेल पाहून विराटही काहीकाळ स्तब्ध झाला.  

रोहित शर्माचे दणक्यात पुनरागमन, मोडला अझरुद्दीनचा विक्रम; पण भारताने गमावल्या तीन विकेट्स

रोहित व शिखर धवन ही नियमित जोडी सलामीला मैदानावर उतरली आणि लोकेश यष्टींमागे दिसणार आहे, कुलदीप सेनने आजच्या सामन्यातून पदार्पण केले आहे. रोहित-धवनने संयमी सुरुवात केली आणि चौथ्या डावात बांगलादेशने फिरकीपटू मेहिदी हसनला गोलंदाजीला आणले. त्याने सहाव्या षटकात भारताला पहिला धक्का दिला. धवन रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात ७ धावांवर त्रिफळाचीत झाला. रोहित व विराट कोहली यांनी चांगली खेळी केली होती, परंतु शाकिब अल हसनने एकाच षटकात दोघांना बाद केले. त्याने रोहितला ( २७) त्रिफळाचीत केले, तर तिसऱ्या चेंडूवर विराटचा ( ९) लिटन दासने अफलातून झेल घेतला. भारताचे आघाडीचे तीनही फलंदाज ४९ धावांवर माघारी परतले.

लिटन दासने घेतलेला झेल पाहून विराट स्तब्ध झाला... 
 



सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: IND vs BAN 1st ODI Live Update :  Sensational catch by Litton Das! Rohit Sharma (  27) and Virat Kohli ( 9) dismissed in shakib al hasan single over, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.