Join us  

IND vs BAN 1st ODI : वडील चालवतात सलून, पोराने मिळवलं टीम इंडियाचं तिकीट, रोहितने उतरवला ४ ऑलराऊंडरचा संघ

India vs Bangladesh 1st ODI Live Update :  २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होतेय, कारण संघातील सीनियर खेळाडू परतले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 11:07 AM

Open in App

India vs Bangladesh 1st ODI Live Update :  २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होतेय, कारण संघातील सीनियर खेळाडू परतले आहेत. भारत-बांगलादेश यांच्यातली पहिली वन डे मीरपूर येथे आज खेळवली जात आहेत. न्यूझीलंड दौऱ्यावरून काही खेळाडू थेट बांगलादेशमध्ये दाखल झाले आहेत, त्यामुळे त्यांना येथील परिस्थितीशी जुळवून घेण्यात अडचण होऊ शकते. त्यामुळे आज रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला खेळवतो, याची उत्सुकता आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 

  • या कॅलेंडर वर्षात सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये लिटन दासने बांगलादेशकडून सर्वाधिक १७०३ धावा केल्या आहेत. २०२२मध्ये बाबर आजम हा अव्वल स्थानी आहे
  • बांगलादेशला  १९८८ पासून भारताविरुद्ध केवळ पाच वन डे सामने जिंकता आले आहेत. २०१५मध्ये बांगलादेशने भारतावर अखेरचा विजय मिळवला होता.
  • मालिकेपूर्वी रवींद्र जडेजा, यश दयाल यांनी माघार घेतली आणि काल मोहम्मद शमीला माघार घेतल्यानं भारतासमोर तगडा संघ मैदानावर उतरवण्याचे ध्येय आहे.

कोण आहे कुलदीप सेन? 

  • २२ ऑक्टोबर १९९६ साली मध्य प्रदेशमधील हरिहरपूर गावातील कुलदीपचा जन्म... त्याचे वडील सलून मध्ये काम करतात आणि ८ वर्षांपासून कुलदीपने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.  
  • कुलदीप स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून व आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्सने २० लाखांत कुलदीपला आपल्या ताफ्यात घेतले. त्याने ७ सामन्यांत ८ विकेट्स घेतल्या 
  • १ नोव्हेंबर २०१८ मध्ये मध्य प्रदेश संघाकडून रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले. २१ नोव्हेंबर २०१८मध्ये त्याने पंजाबविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या. त्यानंतर सय्यद मुश्ताक आली आणि  विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतही त्याने आपला दम दाखवला.  न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या ३ वन डे सामन्यांच्या मालिकेत तो भारत अ संघाचा सदस्य होता. 

    भारताची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा,  शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, मोहम्मद सिराज व कुलदीप सेन 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्मा
Open in App