IND vs BAN, 1st Test : भारत-बांगलादेश यांच्यातले कसोटी रेकॉर्ड कोणाच्या बाजूने? जाणून घ्या पहिल्या सामन्यापूर्वी महत्त्वाची आकडेवारी 

भारताविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान धक्का देण्याच्या तयारीत आहेत. १४ डिसेंबरपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होतेय, तर दुसरी कसोटी २२ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 01:37 PM2022-12-13T13:37:04+5:302022-12-13T13:37:25+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN, 1st Test : A look at some of the interesting stats ahead of the India vs Bangladesh Test series  | IND vs BAN, 1st Test : भारत-बांगलादेश यांच्यातले कसोटी रेकॉर्ड कोणाच्या बाजूने? जाणून घ्या पहिल्या सामन्यापूर्वी महत्त्वाची आकडेवारी 

IND vs BAN, 1st Test : भारत-बांगलादेश यांच्यातले कसोटी रेकॉर्ड कोणाच्या बाजूने? जाणून घ्या पहिल्या सामन्यापूर्वी महत्त्वाची आकडेवारी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh, 1st Test : वन डे मालिकेत बांगलादेशने २-१ असा विजय मिळवून इतिहास घडविला. आता भारताविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान धक्का देण्याच्या तयारीत आहेत. १४ डिसेंबरपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होतेय, तर दुसरी कसोटी २२ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. रोहित शर्माला दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे आणि लोकेश राहुलकडे संघाचे नेतृत्व आहे. रोहितच्या जागी अभिमन्यू ईश्वरनची संघात निवड केली गेली आहे.

IND vs BAN, 1st Test : बांगलादेशचा कसोटी कर्णधार शाकिब अल हसनला हॉस्पिटलमध्ये करावं लागलं भरती; जाणून घ्या अपडेट्स 

नोव्हेंबर २०१९ मध्ये भारत-बांगलादेश यांच्यात अखेरचा कसोटी सामना  झाला होता आणि त्यात भारताने एक डाव व ४६ धावांनी विजय मिळवला होता. उभय संघांमध्ये आतापर्यंत ११ कसोटी सामने झाले आणि बांगलादेशला एकदाही विजय मिळवता आलेला नाही.  

सर्वाधिक धावा
सचिन तेंडुलकरने भारत-बांगलादेश यांच्यातल्या कसोटी सामन्यांत सर्वाधिक धावा केल्या आहेत. सचिनने ७ कसोटीत १३६.६६च्या सरासरीने ८२० धावा केल्या आहेत

सर्वाधिक शतक
भारत-बांगलादेश यांच्यातल्या कसोटी सामन्यांत सर्वाधिक शतकांचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने ५ शतकं झळकावली आहेत

सर्वाधिक विकेट्स
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी सामन्यांत झहीर खानने सर्वाधिक ३१ विकेट्स घेतल्या आहेत. इरफान पठाणने बांगलादेशविरुद्ध कसोटीत पाच विकेट्स तीनवेळा घेण्याचा विक्रम केला आहे. क्षेत्ररक्षणाचा विचार केल्यास राहुल द्रविडने बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक १३ झेल टिपले आहेत.  

भारताचा कसोटी संघ-  लोकेश राहुल (कर्णधार), शुबमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, चेतेश्वर पुजारा ( उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, सौरभ कुमार, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमेश यादव, नवदीप सैनी. 

बांगलादेशचा कसोटी संघ ( पहिल्या सामन्यासाठी) - महमुदूल हसन जॉयन, नजमूल होसैन शांतो, मोमिूनल , जाकारी होसैन, यासीर अली, मुश्फिकर रहिम, शाकिब अल हसन , लिटन दास, सोहन, मेहिदी हसन, तज्जूल, तस्किन अहमद, खालेद, इबादत होसैन, शॉरिफुल, रेजौल इस्लाम, अनामुल हक  

Web Title: IND vs BAN, 1st Test : A look at some of the interesting stats ahead of the India vs Bangladesh Test series 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.