India vs Bangladesh, 1st Test : बांगलादेश आणि भारत यांच्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. वन डे मालिका जिंकल्यानंतर यजमान बांगलादेश कसोटीतही निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज आहेत. पण, कसोटीच्या आदल्या दिवशी बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याला ( Shakib Al Hasan) हॉस्पिटलमध्ये भरती करावंल लागलं. मंगळवारी सकाळी सराव सत्राला आल्यानंतर काहीवेळात शाकिबने सपोर्ट स्टाफसोबत हॉस्पिटल गाठले. त्यामुळे पहिल्या कसोटीत शाकिबच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित उपस्थित झाला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून शाकिबची दुखापत गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे.
जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर बांगलादेश क्रिकेट संघाचा सराव सुरू होता. ''घाबरण्याची गोष्ट नाही. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये जाण्याकरीता अन्य कोणतीच गाडी उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे शाकिबला रुग्णवाहिकेतून नेण्यात आले,''असे बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने The Daily Star ला सांगितले. ''शाकिबला अशक्तपणा जाणवला आणि त्यामुळेच तपासणीसाठी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले,''असेही त्यांनी सांगितले. तपासणीनंतर शाकिब पुन्हा स्टेडियममध्ये आला. शाकिबने सोमवारीही सराव सत्रात सहभाग घेतला नव्हता.
भारताचा कसोटी संघ- लोकेश राहुल (कर्णधार), शुबमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, चेतेश्वर पुजारा ( उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, सौरभ कुमार, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमेश यादव, नवदीप सैनी.
बांगलादेशचा कसोटी संघ ( पहिल्या सामन्यासाठी) - महमुदूल हसन जॉयन, नजमूल होसैन शांतो, मोमिूनल, जाकारी होसैन, यासीर अली, मुश्फिकर रहिम, शाकिब अल हसन , लिटन दास, सोहन, मेहिदी हसन, तज्जूल, तस्किन अहमद, खालेद, इबादत होसैन, शॉरिफुल, रेजौल इस्लाम, अनामुल हक
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"