IND vs BAN 1st Test : जाकिर हसनच्या शतकानं वाढवलं टीम इंडियाचं टेंशन; अक्षर पटेलने ब्रेक लावलाय पण...

India vs Bangladesh, 1st Test :  भारताने पहिल्या डावातील २७४ धावसंख्येत २५८ धावांची अधिक भर घातली आणि बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 04:08 PM2022-12-17T16:08:06+5:302022-12-17T16:08:55+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN 1st Test : Century on debut for Zakir Hasan,  Day four ends with Bangladesh : 272/6, They need another 241 runs to win with 4 wickets in hand. | IND vs BAN 1st Test : जाकिर हसनच्या शतकानं वाढवलं टीम इंडियाचं टेंशन; अक्षर पटेलने ब्रेक लावलाय पण...

IND vs BAN 1st Test : जाकिर हसनच्या शतकानं वाढवलं टीम इंडियाचं टेंशन; अक्षर पटेलने ब्रेक लावलाय पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh, 1st Test :  भारताने पहिल्या डावातील २७४ धावसंख्येत २५८ धावांची अधिक भर घातली आणि बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले. बांगलादेशचे फलंदाज चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच गुडघे टेकतील असे वाटले होते. पण, २४ वर्षीय पदार्पणवीर जाकिर हसन भारतीय गोलंदाजांना भिडला. त्याने पदार्पणात शतक झळकावून टीम इंडियाचं टेंशन वाढवलं होतं, परंतु अक्षर पटेलने अखेरच्या काही षटकांत झटपट धक्के देत भारताला कमबॅक करून दिले.

IND vs BAN 1st Test : विराटने सोडला, पण रिषभने पकडला! लोकेशच्या जिवात जीव आला; बांगलादेशला पहिला धक्का बसला, Video 


जाकिर हसन व नजमूल शांतो (६७) यांनी दमदार खेळ केला. पण, लंच ब्रेकनंतर उमेश यादवने भारताला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. नजमूल व हसन यांनी पहिल्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केली. भारताविरुद्ध ही चौथ्या डावात सलामीवीरांची चौथी सर्वोत्तम भागीदारी ठरली. अक्षर पटेलने दुसरा धक्का देताना यासीर अलीला ५ धावांवर त्रिफळाचीत केले.  लिटन दासही १९ धावांवर बाद झाला. 
२४ वर्षीय पदार्पणवीर जाकिर हसन हा भारतीय गोलंदाजांसमोर उभा राहिला  आणि त्याने खणखणीत शतक झळकावले. मागील १० वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात पदार्पणात शतक करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी २०२१ मध्ये कायले मेयर्सने  बांगलादेशविरुद्ध चट्टोग्राम येथे विक्रमी शतक झळकावले होते. कसोटी पदार्पणात शतक करणारा तो बांगलादेशचा चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी अमिमूल इस्लाम ( वि. भारत, ढाका, २०००), मोहम्मद अश्रफुल ( वि. श्रीलंका, कोलंबो, २००१) आणि अबुल हसन ( वि. वेस्ट इंडिज, खुल्ना, २०१२) यांनी हा पराक्रम केला होता. पण, आर अश्विनने अनुभवाच्या जोरावर जाकिरची विकेट घेतली. त्याने २२४ चेंडूंत १३ चौकार व १ षटकारासह १०० धावा केल्या. 


मुश्फिकर रहिम आणि शाकिब अल हसन ही अनुभवी जोडी मैदानावर होती आणि रिषभ पंतने सोपा झेल सोडून रहिमला जीवदानही दिले होते. पण, अक्षरने २३ धावांवर रहीमचा त्रिफळा उडवला. त्यानंतर नुरूल हसन (३) याला रिषभने चपळाईने यष्टिचीत केले. बांगलादेशने चौथ्या दिवसअखेर ६ फलंदाज २७२ धावा केल्या. शाकिब व मेहिदी हसन मिराज यांनी दिवसअखेर खिंड लढवली आहे आणि आता त्यांना पाचव्या दिवशी विजयासाठी २४१ धावा करायच्या आहेत. भारताला विजयासाठी चार विकेट्स हव्या आहेत. 

तत्पूर्वी, भारताच्या पहिल्या डावातील ४०४ धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर भारताने गुंडाळला.  कुलदीपने १६-६-४०-५ अशी कामगिरी केली. मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या, तर उमेश यादव व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. फॉलो ऑन न देता फलंदाजीचा सराव मिळावा या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या लोकेश राहुलला ( २३) पुन्हा अपयश आले. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी ११३ धावांची भागीदारी केली. शुभमनने १५२ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ११०  धावा केल्या. पुजारानेही १३० चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने नाबाद १०२ धावा केल्या.  भारताने दुसरा डाव २ बाद २५८ धावांवर घोषित करताना बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले.    

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs BAN 1st Test : Century on debut for Zakir Hasan,  Day four ends with Bangladesh : 272/6, They need another 241 runs to win with 4 wickets in hand.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.