Join us  

IND vs BAN, 1st Test : शुभमन गिलच्या विकेटसाठी DRS; तिसऱ्या अम्पायरच्या उत्तराने बांगलादेशी खेळाडू उडाले

India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात विजयाचा मजबूत पाया रचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 1:41 PM

Open in App

India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात विजयाचा मजबूत पाया रचला आहे. ४०४ धावांच्या प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांत गुंडाळून भारताने २७४ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर फॉलो ऑन न देता भारतीय फलंदाज पुन्हा मैदानावर उतरले. शुभमन गिलचेतेश्वर पुजारा या जोडीने बांगलादेशच्या नाकी नऊ आणले. त्यात एक विचित्र प्रकार घडला.  भारताच्या पहिल्या डावातील ४०४ धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. मोहम्मद सिराजने सलामवीर नजमूल शांतोला यष्टिरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद केले. उमेश यादवने दुसरा धक्का देताना यासिर अलीचा ( ४) त्रिफळा उडवला. जाकीर हसन ( २०) व लिटन दास ( २४) यांनी बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कुलदीपने मुश्फीकर रहिम ( २८), कर्णधार शाकिब अल हसन ( ३) आणि नुरूल हसन ( १६) यांच्या विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) व कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) यांनी बांगलादेशला धक्के दिले. कुलदीपने कसोटी कारकीर्दित तिसऱ्यांदा डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.  ( India vs Bangladesh Live Scorecard )

अक्षर पटेलने शेवटची विकेट घेत बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांत गुंडाळला. २५४ धावांची आघाडी असताना भारताने फॉलो ऑन न देता पुन्हा फलंदाजीला येण्याचा निर्णय घेतला.  कुलदीपने १६-६-४०-५ अशी कामगिरी केली. मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या, तर उमेश यादव व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. फॉलो ऑन न देता फलंदाजीचा सराव मिळावा या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या लोकेश राहुलला ( २३) पुन्हा अपयश आले. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी झटपट अर्धशतकी भागीदारी करताना भारताच्या धावसंख्येत भर घातली. गिलने २०२२ मध्ये भारताच्या सलामावीराने कसोटीत सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम केला. 

नेमकं काय झालं?

पण, ३२व्या षटकात यासिर अलीच्या गोलंदाजीवर गिल LBW होता. मैदानावरील अम्पायरने त्याला नाबाद देताच शाकिब अल हसनने DRS घेतला. बांगलादेशच्या खेळाडूंना ही विकेट मिळेल  हा आत्मविश्वास होता आणि ते मोठ्या स्क्रिनकडे आस लावून पाहत होते. तितक्याच तिसऱ्या अम्पायरने मॅसेज केला की DRS सिस्टम बंद पडली आहे आणि ते ही विकेट तपासू शकत नाही. त्यामुळे गिल नाबाद राहिला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशशुभमन गिलचेतेश्वर पुजारा
Open in App