IND vs BAN 1st Test : काल 'बेल्स' मुळे वाचला, म्हणून आज गोलंदाजाने स्टम्पच उखडून टाकला; श्रेयस अय्यर कसा बाद झाला? 

India vs Bangladesh, 1st Test : बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरचे ( Shreyas Iyer) शतक पाहायला मिळेल, अशी अपेक्षा फोल ठरली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 10:13 AM2022-12-15T10:13:11+5:302022-12-15T10:13:32+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN 1st Test : Ebadot Hosain bowls a ripper and cleans Shreyas Iyer up; Iyer goes for 86 in 192 balls  | IND vs BAN 1st Test : काल 'बेल्स' मुळे वाचला, म्हणून आज गोलंदाजाने स्टम्पच उखडून टाकला; श्रेयस अय्यर कसा बाद झाला? 

IND vs BAN 1st Test : काल 'बेल्स' मुळे वाचला, म्हणून आज गोलंदाजाने स्टम्पच उखडून टाकला; श्रेयस अय्यर कसा बाद झाला? 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh, 1st Test : बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरचे ( Shreyas Iyer) शतक पाहायला मिळेल, अशी अपेक्षा फोल ठरली. सुरुवातीच्या षटकात अय्यरला पुन्हा जीवदान मिळाल्याने भारतीय चाहते आनंदी झाले खरे, परंतु इबादत होसैनने भारतीय फलंदाजाला शतकापासून वंचित ठेवले. होसैनच्या गोलंदाजीवर कालच श्रेयसची विकेट पडली असती, परंतु चेंडू व स्टम्प्सचा संपर्क होऊनही बेल्स न पडल्याने श्रेयस खेळपट्टीवर उभा राहिला. पण, आज होसैनने ती संधीच दिली नाही आणि अप्रतिम चेंडू टाकताना श्रेयसचा त्रिफळाच उडवला. 

अय्यर झाला होता बाद पण...
अय्यर ७८ धावांवर असताना इबादत होसैनच्या चेंडूने यष्टींचा वेध घेतला होता. चेंडू व यष्टी यांच्यात संपर्क झाला आणि बेल्सची लाईट पेटली. पण, बेल्स खाली न पडल्याने अय्यरला नाबाद दिले गेले. बांगलादेशचे खेळाडूही अचंबित झाले. यावरून आकाश चोप्राने लाईट पेटल्या तरीही आऊट दिले जावे अशी मागणी केली.  


शुबमन गिल ( २०), लोकेश राहुल ( २२) व  विराट कोहली ( १) हे तिघे फलकावर ४८ धावा असताना माघारी परतले.  रिषभ पंत व चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. पण, मेहिदी हसन मिराजने रिषभला ( ४६) माघारी जाण्यास भाग पाडले. पुजाराने ७८वी धाव पूर्ण करताच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत आठवे स्थान पटकावले. त्याने दीलिप वेंगसरकरांचा विक्रम मोडला. पुजारा-श्रेयस यांच्या ३१७ चेंडूंत १४९ धावांच्या भागीदारीला तैजूल इस्लामची नजर लागली अन् पुजारा २०३ चेंडूंत ११ चौकारांसह ९० धावांवर बाद झाला. दिवसाच्या अखेरच्या षटकात अक्षर पटेल ( १३) LBW झाला अन् भारताच्या ६ बाद २७८ धावा झाल्या होत्या.  ( India vs Bangladesh Live Scorecard ) 

अय्यर ८२ धावांवर नाबाद खेळत होता आणि त्याला कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही जीवदान मिळाले. पण, इबादत होसैनने धैर्य सोडले नाही आणि त्याने अप्रतिम चेंडू टाकून श्रेयसचा ८६ धावांवर त्रिफळा उडवला. अय्यरने १९२ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. 


 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs BAN 1st Test : Ebadot Hosain bowls a ripper and cleans Shreyas Iyer up; Iyer goes for 86 in 192 balls 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.