IND vs BAN 1st Test : बांगलादेशच्या ओपनर्सचा जबरदस्त खेळ; विजयासाठीच्या धावांचं अंतर केलं कमी, भारताची वाढली डोकेदुखी 

India vs Bangladesh, 1st Test : भारताने पहिल्या डावातील २७४ धावसंख्येत २५८ धावांची अधिक भर घातली आणि बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 11:14 AM2022-12-17T11:14:23+5:302022-12-17T11:18:04+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN 1st Test : Half-century for both the openers, Zakir (55*) and Shanto (64*), India are still in search of their first wicket, BAN: 119/0 (42); need 394 runs  | IND vs BAN 1st Test : बांगलादेशच्या ओपनर्सचा जबरदस्त खेळ; विजयासाठीच्या धावांचं अंतर केलं कमी, भारताची वाढली डोकेदुखी 

IND vs BAN 1st Test : बांगलादेशच्या ओपनर्सचा जबरदस्त खेळ; विजयासाठीच्या धावांचं अंतर केलं कमी, भारताची वाढली डोकेदुखी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh, 1st Test : कुलदीप यादवच्या पाच विकेट्स अन् ४० धावा अशा अष्टपैलू कामगिरीनंतर शुबमन गिल व चेतेश्वर पुजारा यांनी वैयक्तिक शतक झळकावले. भारताने पहिल्या डावातील २७४ धावसंख्येत २५८ धावांची अधिक भर घातली आणि बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानासमोर बांगलादेशचा संघ डगमगून जाईल असे वाटत होते, पण त्यांच्या ओपनर्सनी जबरदस्त खेळ केला. त्यांच्या या खेळीने टीम इंडियाच्या मनोबलाचे खच्चिकरण नक्की केले आहे.

मोठा धक्का! कसोटी वाचवण्याचा बांगलादेशचा प्रयत्न अन् कर्णधारासह प्रमुख गोलंदाजाची माघार 

भारताच्या पहिल्या डावातील ४०४ धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर भारताने गुंडाळला.  कुलदीपने १६-६-४०-५ अशी कामगिरी केली. मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या, तर उमेश यादव व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. फॉलो ऑन न देता फलंदाजीचा सराव मिळावा या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या लोकेश राहुलला ( २३) पुन्हा अपयश आले. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी ११३ धावांची भागीदारी केली. शुभमनने १५२ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ११०  धावा केल्या. पुजारानेही १३० चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने नाबाद १०२ धावा केल्या.  भारताने दुसरा डाव २ बाद २५८ धावांवर घोषित करताना बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले. ( India vs Bangladesh Live Scorecard )

   


बांगलादेशचे फलंदाज चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच गुडघे टेकतील असे वाटले होते. पण, जाकिर हसन व नमजूल शांतो यांनी दमदार खेळ केला. या दोघांनी लंच ब्रेकपर्यंत चांगली खेळी करताना संघाला बिनबाद ११९ धावा उभारून दिल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs BAN 1st Test : Half-century for both the openers, Zakir (55*) and Shanto (64*), India are still in search of their first wicket, BAN: 119/0 (42); need 394 runs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.