IND vs BAN 1st Test : विराट, लोकेश, गिल माघारी परतले; ७ धावांच्या अंतराने टीम इंडियाने तीन फलंदाज गमावले

India vs Bangladesh, 1st Test : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारताला महागात पडताना दिसतोय..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 10:41 AM2022-12-14T10:41:14+5:302022-12-14T10:41:54+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN 1st Test : India lose 3 wickets for 48 runs in the 1st Test. Taijul Islam removes Virat Kohli for 1 | IND vs BAN 1st Test : विराट, लोकेश, गिल माघारी परतले; ७ धावांच्या अंतराने टीम इंडियाने तीन फलंदाज गमावले

IND vs BAN 1st Test : विराट, लोकेश, गिल माघारी परतले; ७ धावांच्या अंतराने टीम इंडियाने तीन फलंदाज गमावले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh, 1st Test : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारताला महागात पडताना दिसतोय.. तैजूल इस्लामच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाज चाचपडले आणि आघाडीचे तिघेही माघारी परतले. 

 ट्वेंटी-२०मध्ये निराशा आता कसोटी वर्ल्ड कपमधून आशा! एक चूक अन् टीम इंडिया गमावेल ICC ट्रॉफी

वन डे मालिकेतील अपयश विसरून भारतीय संघ नव्या उम्मेदीनं कसोटी मालिकेत मैदानावर उतरला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करतोय आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. भारतीय संघ आज तीन फरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरला आहे. लोकेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अभिमन्यू ईश्वरनला संधी मिळण्याची शक्यता होती, परंतु तसे काहीच झाले नाही. शुबमन गिल व लोकेश राहुल ही जोडी सलामीला आली. पण, गिलला संधीचं सोनं करण्यात अपयश आलं. ( India vs Bangladesh Live Scorecard

 

शुबमन गिल १४व्या षटकात तैजूल इस्लामच्या गोलंदाजीवर उगाच स्वीप मारायला गेला अन् पहिल्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या यासीर अलीने धावत जाऊन सोपा झेल टिपला. गिल २० धावांवर माघारी परतल्यानंतर बांगलादेशने सामन्यावर पकड घेण्यास सुरुवात केली. कर्णधार लोकेश खालेद अहमदच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. अहमदने टाकलेला चेंडू लोकेशच्या बॅटला लागून यष्टींवर आदळला अन् लोकेशलाही २२ धावांवर माघारी परतावे लागले. बांगलादेशमध्ये दुसरीच कसोटी खेळणारा विराट कोहली आज कसोटीतील शतकाचा दुष्काळ दूर करेल असे वाटले होते. पण, इस्लामच्या अप्रतिम वळणाऱ्या चेंडूवर विराट LBW झाला. १ धावा करून विराट माघारी परतला अन् भारताने ७ धावांच्या अंतराने तीन विकेट्स गमावल्या. बिनबाद ४१ वरून भारताची अवस्था ३ बाद ४८ अशी झाली. 


भारतीय संघ - लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटले, आर अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs BAN 1st Test : India lose 3 wickets for 48 runs in the 1st Test. Taijul Islam removes Virat Kohli for 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.