India vs Bangladesh, 1st Test : वन डे मालिकेनंतर, भारतीय संघ आता बांगलादेशसोबत २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी लढत १४ डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना २२ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा अंगठ्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. ७ डिसेंबर रोजी मीरपूर येथे बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये क्षेत्ररक्षण करताना रोहितच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. रोहितच्या जागी अभिमन्यू ईश्वरनचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
टीम इंडिया इंग्लंडची कॉपी करणार! विराट, रोहित आदी सीनियर्सना बाहेर बसवून मोठा निर्णय घेणार
रोहितशह मोहम्मद शमी व रवींद्र जडेजा यांनाही बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागले आहे. रोहित दुसऱ्या कसोटीसाठी तंदुरूस्त होणे अपेक्षित आहे, परंतु अंतिम निर्णय BCCI घेईल. शमी व जडेजाच्या जागी नवदीप सैनी आणि सौरभ कुमार या युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. भारत अ संघाचा आघाडीचा फलंदाज सौरभ कुमार एका मोठ्या व्यासपीठावर खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. जयदेव उनाडकट हा देखील १२ वर्षांनंतर कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात असणार आहे.
रिषभ पंत आला, पण BCCI ने नवा उप कर्णधार निवडला; ओपनिंगला उतरणार नवी जोडी
कसोटी सामन्याची वेळकसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरू होईल आणि नाणेफेक सामन्याच्या अर्धा तास आधी होईल. म्हणजे नाणेफेक ९ वाजता होईल. दोन्ही कसोटी सामन्यांची वेळ सारखीच राहील कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण
या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे, लाइव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अॅपवर होईल
भारताचा कसोटी संघ- लोकेश राहुल (कर्णधार), शुबमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, चेतेश्वर पुजारा ( उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, सौरभ कुमार, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमेश यादव, नवदीप सैनी.
बांगलादेशचा कसोटी संघ ( पहिल्या सामन्यासाठी) - महमुदूल हसन जॉयन, नजमूल होसैन शांतो, मोमिूनल , जाकारी होसैन, यासीर अली, मुश्फिकर रहिम, शाकिब अल हसन , लिटन दास, सोहन, मेहिदी हसन, तज्जूल, तस्किन अहमद, खालेद, इबादत होसैन, शॉरिफुल, रेजौल इस्लाम, अनामुल हक
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"