IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video

ind vs ban 1st test : पहिल्या कसोटी सामन्यात रिषभ पंतने शतकी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 06:58 PM2024-09-21T18:58:59+5:302024-09-21T19:01:53+5:30

whatsapp join usJoin us
ind vs ban 1st test KL Rahul wakes up from dressing room thinking Rishabh Pant will be out, Mohammed Siraj's reaction goes viral  | IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video

IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

rishabh pant century in test | चेन्नई : भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. बांगलादेशविरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून रिषभ पंत आणि शुबमन गिल यांनी शतकी खेळी केली. भारताने आपल्या पहिल्या डावात ३७६ धावा केल्यानंतर पाहुणा बांगलादेशचा संघ त्यांच्या पहिल्या डावात अवघ्या १४९ धावा करू शकला. मग टीम इंडियाने दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारुन बांगलादेशसमोर ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले. रिषभ पंतने ४ षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने १२८ चेंडूत १०९ धावांची शतकी खेळी केली.

दरम्यान, लोकेश राहुलचा एक हास्यास्पद व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शाकिब अल हसनच्या षटकात रिषभ पंतने मोठा फटका खेळला असता चेंडू हवेत गेला. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतो झेल घेईल असे समजून ड्रेसिंगरुममध्ये बसलेला राहुल खेळपट्टीवर येण्यासाठी तयारी करू लागला. तेव्हा शांतोने झेल घेतला असता तर पंतचे शतक पूर्ण झाले नसते.

भारताच्या दुसऱ्या डावातील ४९व्या षटकात हा प्रकार घडला. या षटकाच्या सहाव्या चेंडूवर रिषभ पंतने स्लॉग स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण शॉट चुकीचा ठरला, त्यामुळे चेंडू बराच वेळ हवेतच राहिला. मिडविकेटवर तैनात असलेला नजमुल शांतो झेल घेईल असे वाटत होते. म्हणून भारतीय ड्रेसिंग रूममध्ये बसलेला पुढचा फलंदाज केएल राहुल रिषभ पंतच्या जागी खेळपट्टीवर येण्यासाठी खुर्चीवरून उठला. पण, झेल न घेतल्याने राहुल पुन्हा जागेवर बसला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये केएल राहुलच्या शेजारी बसलेल्या मोहम्मद सिराजचे हावभाव सर्वकाही सांगून जातात.  

Web Title: ind vs ban 1st test KL Rahul wakes up from dressing room thinking Rishabh Pant will be out, Mohammed Siraj's reaction goes viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.