Join us  

IND vs BAN 1st Test : फुल ऑन ठसन! फलंदाजाने मोहम्मद सिराजला डिवचले अन् विराट कोहलीने त्याला अंगावर घेतले, Video 

India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, आर अश्विन, रिषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारताने चारशेपार धावसंख्या उभी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 2:56 PM

Open in App

India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, आर अश्विन, रिषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारताने चारशेपार धावसंख्या उभी केली. त्यानंतर मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) पहिल्या चेंडूवरच बांगलादेशला धक्का दिला. सिराज इथेच थांबला नाही, तर त्याचे धक्कासत्र सुरूच राहिले. सिराजने लक्ष विचलित करण्यासाठी बांगलादेशच्या लिटन दासने ( Liton Das) त्याला डिवचेल. पण, असे करून त्याने स्वतःच्याच पायावर धोंडा मारला अन् विराट कोहलीने ( Virat Kohli) त्याला मग अंगावर घेतले. 

शुबमन गिल ( २०), लोकेश राहुल ( २२) व  विराट कोहली ( १) हे तिघे फलकावर ४८ धावा असताना माघारी परतले.  रिषभ पंत व चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. पण, मेहिदी हसन मिराजने रिषभला ( ४६) माघारी जाण्यास भाग पाडले.  पुजारा-श्रेयस यांच्या ३१७ चेंडूंत १४९ धावांच्या भागीदारीला तैजूल इस्लामची नजर लागली अन् पुजारा २०३ चेंडूंत ११ चौकारांसह ९० धावांवर बाद झाला. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरचे ( Shreyas Iyer) शतक हुकले, परंतु आर अश्विन व कुलदीप यादव या जोडीने कमाल केली. 

अश्विन आणि कुलदीप यांनी २०० चेंडूंत ९२ धावांची भागीदारी केली. अश्विनने ११३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा केल्या. श्रेयसचा ८६ धावांवर त्रिफळा उडवला. अय्यरने १९२ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने या धावा केल्या.  अश्विनने वैयक्तिक अर्धशतक झळकावताना आठव्या विकेटसाठी कुलदीपसह भारताच्या धावांची गती वाढवली. अश्विन आणि कुलदीप यांनी २०० चेंडूंत ९२ धावांची भागीदारी केली. भारताने पहिल्या डावात ४०४ धावा केल्या.  ( India vs Bangladesh Live Scorecard ) 

सिराजने पहिल्याच चेंडूवर बांगलादेशचा सलामवीर नजमूल शांतोला यष्टिरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद केले. उमेश यादवने दुसरा धक्का देताना यासिर अलीचा ( ४) त्रिफळा उडवला. जाकीर हसन ( २०) व लिटन दास ( २४) यांनी बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु सिराजने  त्यांचा डाव हाणून पाडला. १४व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लिटन दासने जाणूनबुजून सिराजला डिवचले. त्यानंतर सिराजने पुढच्याच षटकात दासचा त्रिफळा उडवला. पेव्हेलियनच्या दिशेने जाणाऱ्या दासला मग विराटने चिडवले. सामन्यातील हा सर्व प्रकार भारतीय चाहत्यांना मात्र आनंद देणारा ठरला. बांगलादेशने २२ षटकांत ४ बाद ६६ धावा केल्या आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशमोहम्मद सिराजविराट कोहली
Open in App