India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात विजयाचा मजबूत पाया रचला आहे. ४०४ धावांच्या प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांत गुंडाळून भारताने २७४ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर फॉलो ऑन न देता भारतीय फलंदाज पुन्हा मैदानावर उतरले. शुभमन गिल व चेतेश्वर पुजारा या जोडीने बांगलादेशच्या नाकी नऊ आणले. गिलने कसोटीतील पहिले शतक झळकावले, तर पुजाराने सातत्यपूर्ण खेळ करताना शतकी खेळी केली. ( India vs Bangladesh Live Scorecard )
IND vs BAN, 1st Test : शुभमन गिलच्या विकेटसाठी DRS; तिसऱ्या अम्पायरच्या उत्तराने बांगलादेशी खेळाडू उडाले
भारताच्या पहिल्या डावातील ४०४ धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. मोहम्मद सिराजने सलामवीर नजमूल शांतोला यष्टिरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद केले. उमेश यादवने दुसरा धक्का देताना यासिर अलीचा ( ४) त्रिफळा उडवला. जाकीर हसन ( २०) व लिटन दास ( २४) यांनी बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कुलदीपने मुश्फीकर रहिम ( २८), कर्णधार शाकिब अल हसन ( ३) आणि नुरूल हसन ( १६) यांच्या विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) व कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) यांनी बांगलादेशला धक्के दिले. कुलदीपने कसोटी कारकीर्दित तिसऱ्यांदा डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
अक्षर पटेलने शेवटची विकेट घेत बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांत गुंडाळला. २५४ धावांची आघाडी असताना भारताने फॉलो ऑन न देता पुन्हा फलंदाजीला येण्याचा निर्णय घेतला. कुलदीपने १६-६-४०-५ अशी कामगिरी केली. मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या, तर उमेश यादव व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. फॉलो ऑन न देता फलंदाजीचा सराव मिळावा या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या लोकेश राहुलला ( २३) पुन्हा अपयश आले.
शुभमन गिल आणि
चेतेश्वर पुजारा यांनी झटपट अर्धशतकी भागीदारी करताना भारताच्या धावसंख्येत भर घातली. गिलने २०२२ मध्ये भारताच्या सलामावीराने कसोटीत सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम केला.
शुभमनने मिळालेल्या संधीवर सोनं करताना कसोटीतील पहिले शतकही पूर्ण केले. १५२ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह गिलने ११० धावा केल्या. त्याने पुजारासह दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. बांगलादेशविरुद्ध कसोटीत शतक झळकावणारा गिल हा सातवा भारतीय सलमीवीर ठरला. यापूर्वी गौतम गंभीर, वासिम जाफर, दिनेश कार्तिक, शिखर धवन, मुरली विजय, मयांक अग्रवाल यांनी हा पराक्रम केला आहे. पुजारानेही धावांची गती वाढवली आणि कसोटीतील त्याचे सर्वात जलद शतक झळकावले.
३ वर्ष व ३४७ दिवसांनंतर ( एकूण १४४३ दिवस) पुजाराने कसोटीत शतक पूर्ण केले. ५२ इनिंग्जनंतर केलेली ही खेळी त्याची कसोटीतील सर्वात जलद शतकी खेळी ठरली. त्याचे हे १९वे शतक ठरले आणि भारताने दुसरा डाव २ बाद २५८ धावांवर घोषित करताना बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs BAN, 1st Test : Maiden Test hundred by Shubman Gill 110 (152), Cheteshwar Pujara scored a Test century after 1,443 days and 52 innings, India also declare with a 512 run lead.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.