India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात विजयाचा मजबूत पाया रचला आहे. ४०४ धावांच्या प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांत गुंडाळून भारताने २७४ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर फॉलो ऑन न देता भारतीय फलंदाज पुन्हा मैदानावर उतरले. शुभमन गिल व चेतेश्वर पुजारा या जोडीने बांगलादेशच्या नाकी नऊ आणले. गिलने कसोटीतील पहिले शतक झळकावले, तर पुजाराने सातत्यपूर्ण खेळ करताना शतकी खेळी केली. ( India vs Bangladesh Live Scorecard )
भारताच्या पहिल्या डावातील ४०४ धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. मोहम्मद सिराजने सलामवीर नजमूल शांतोला यष्टिरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद केले. उमेश यादवने दुसरा धक्का देताना यासिर अलीचा ( ४) त्रिफळा उडवला. जाकीर हसन ( २०) व लिटन दास ( २४) यांनी बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कुलदीपने मुश्फीकर रहिम ( २८), कर्णधार शाकिब अल हसन ( ३) आणि नुरूल हसन ( १६) यांच्या विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) व कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) यांनी बांगलादेशला धक्के दिले. कुलदीपने कसोटी कारकीर्दित तिसऱ्यांदा डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
३ वर्ष व ३४७ दिवसांनंतर ( एकूण १४४३ दिवस) पुजाराने कसोटीत शतक पूर्ण केले. ५२ इनिंग्जनंतर केलेली ही खेळी त्याची कसोटीतील सर्वात जलद शतकी खेळी ठरली. त्याचे हे १९वे शतक ठरले आणि भारताने दुसरा डाव २ बाद २५८ धावांवर घोषित करताना बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"