India vs Bangladesh, 1st Test : ३ बाद ४८ अशी अवस्था टीम इंडियाची झाल्यानंतर रिषभ पंतने आक्रमक खेळी करून डाव सावरला. चेतेश्वर पुजाराची त्याला साथ मिळाली. रिषभ केवळ ४५ चेंडू खेळला, परंतु या खेळीत त्याने दोन मोठे विक्रम नोंदवले. त्याने चौथ्या विकेटसाठी ७३ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली आणि भारताला शंभर पार नेले.
कसला भारी चेंडू टाकला, विराट कोहलीला नाही समजला; बाद झाल्यावर गोलंदाजाकडे पाहत राहिला, Video
शुबमन गिल ( २०) व लोकेश राहुल ( २२) ही जोडी सलामीला आली. पण, गिलला संधीचं सोनं करण्यात अपयश आलं. शुबमन गिल १४व्या षटकात तैजूल इस्लामच्या गोलंदाजीवर उगाच स्वीप मारायला गेला अन् पहिल्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या यासीर अलीने धावत जाऊन सोपा झेल टिपला. कर्णधार लोकेश खालेद अहमदच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. विराट कोहली ( १) आज कसोटीतील शतकाचा दुष्काळ दूर करेल असे वाटले होते. पण, इस्लामच्या अप्रतिम वळणाऱ्या चेंडूवर विराट LBW झाला. बिनबाद ४१ वरून भारताची अवस्था ३ बाद ४८ अशी झाली. . ( India vs Bangladesh Live Scorecard )
रिषभ पंत व चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. रिषभने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४००० धावांचा टप्पाही ओलांडला. रिषभ व चेतेश्वर यांनी भारताला शतकी पार नेले. रिषभला त्याचा सूर गवसलेला दिसला आणि त्यानेही वन डे स्टाईल फटकेबाजी केली. पण, मेहिदी हसन मिराजने रिषभला ( ४६) माघारी जाण्यास भाग पाडले. रिषभच्या खेळीत ६ चौकार व २ षटकारांचा समावेश होता.
रिषभने आजच्या सामन्यात दोन खणखणीत षटकार मारून कसोटीत पन्नास सिक्सचा विक्रम नावावर केला. वीरेंद्र सेहवाग ( ९०), महेंद्रसिंग धोनी ( ७८), सचिन तेंडुलकर ( ६९), रोहित शर्मा ( ६४), कपिल देव ( ६१), सौरव गांगुली ( ५७), रवींद्र जडेजा ( ५५) यांच्या पंक्तित रिषभने स्थान पटकावले, परंतु भारताकडून कसोटीत सर्वात जलद ५० सिक्स मारण्याचा विक्रम त्याने त्याच्या नावावर नोंदवला
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs BAN 1st Test : Rishabh Pant completes two milestones in the first Test against Bangladesh, Pant is the fastest to complete 50 sixes by an Indian in Test cricket history
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.