Join us  

IND vs BAN 1st Test : रिषभ पंत भारताच्या ताफ्यात दाखल झाला, पण BCCI ने नवा उप कर्णधार निवडला; ओपनिंगला उतरणार नवी जोडी

India vs Bangladesh 1st Test : भारतीय संघाला वन डे मालिकेत बांगलादेशकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. आता १४ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होतेय...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 10:20 AM

Open in App

India vs Bangladesh 1st Test : भारतीय संघाला वन डे मालिकेत बांगलादेशकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या वन डे त इशान किशनने केलेली द्विशतकी खेळी आणि विराट कोहलीचे शतक, ही काय तर भारतीयांच्या जखमेवर  मायेचा फूंकर मारणारी गोष्ट ठरली. पण, बांगलादेनशे घरच्या मैदानावर सलग दोन वन डे मालिकेत भारतावर विजय मिळवले आणि हे सत्य नाकारता येणार नाही. त्यात दुखापतीचे भूत भारताच्या मानगूटीवर बसलेले आहेच... कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या वन डे पाठोपाठ आता पहिल्या कसोटी सामन्यातही खेळणार नाही. भारत-बांगलादेश यांच्यात १४ डिसेंबरपासून कसोटी मालिका सुरू होतेय आणि त्यासाठी BCCI ने भारतीय संघात बदल केले आहेत.

भारतासाठी एक समाधानाची गोष्ट घडली आणि ती म्हणजे यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत हा ढाका येथे दाखल झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत रिषभच्या पाठीच्या दुखण्यानं डोकं वर काढलं होतं आणि त्याला बांगलादेशविरुद्धच्या वन डे मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. २४ वर्षीय रिषभ तंदुरुस्त होऊन ढाका येथे दाखल झाला आहे आणि पहिल्या कसोटीत खेळण्यासाठी उपलब्ध आहे. रिषभ उपलब्ध असताना BCCI ने मात्र उप कर्णधार म्हणून चेतेश्वर पुजाराच्या नावाची निवड केली आहे. रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल पहिल्या कसोटीत नेतृत्व सांभाळणार आहे आणि तो शुबमन गिलसोबत सलामीला खेळण्याची शक्यताही अधिक आहे.

रोहितशह मोहम्मद शमी व रवींद्र जडेजा यांनाही बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागले आहे. रोहित दुसऱ्या कसोटीसाठी तंदुरूस्त होणे अपेक्षित आहे, परंतु अंतिम निर्णय BCCI घेईल. शमी व जडेजाच्या जागी नवदीप सैनी आणि सौरभ कुमार या युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. भारत अ संघाचा आघाडीचा फलंदाज सौरभ कुमार एका मोठ्या व्यासपीठावर खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. जयदेव उनाडकट हा देखील १२ वर्षांनंतर कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात असणार आहे.    

 

भारताचा कसोटी संघ-  लोकेश राहुल (कर्णधार), शुबमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, चेतेश्वर पुजारा ( उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, सौरभ कुमार, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमेश यादव, नवदीप सैनी.  ( India’s updated squad for Bangladesh Tests: KL Rahul (C), Shubman Gill, Cheteshwar Pujara (VC), Virat Kohli, Shreyas Iyer, Rishabh Pant (WK), KS Bharat (WK), Ravichandran Ashwin, Axar Patel, Kuldeep Yadav, Shardul Thakur, Mohd. Siraj, Umesh Yadav, Abhimanyu Easwaran, Navdeep Saini, Saurabh Kumar, Jaydev Unadkat) 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरिषभ पंतलोकेश राहुलचेतेश्वर पुजाराशुभमन गिल
Open in App