IND vs BAN 1st Test : श्रेयस अय्यरला जीवदान मिळालं, भारताच्या माजी खेळाडूला नाही पटलं; नियम बदलण्याची केली मागणी 

India vs Bangladesh, 1st Test : चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत हे भारत-बांगलादेश यांच्यातल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचे नायक ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 04:36 PM2022-12-14T16:36:55+5:302022-12-14T16:46:52+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN 1st Test : Shreyas Iyer gets lucky as bails are not dislodged despite ball hitting the stumps, Aakash Chopre demand for change in rule  | IND vs BAN 1st Test : श्रेयस अय्यरला जीवदान मिळालं, भारताच्या माजी खेळाडूला नाही पटलं; नियम बदलण्याची केली मागणी 

IND vs BAN 1st Test : श्रेयस अय्यरला जीवदान मिळालं, भारताच्या माजी खेळाडूला नाही पटलं; नियम बदलण्याची केली मागणी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh, 1st Test : चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत हे भारत-बांगलादेश यांच्यातल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचे नायक ठरले. शुबमन गिल, लोकेश राहुल व विराट कोहली हे झटपट बाद झाल्याने टीम इंडियाची अवस्था  ३ बाद ४८ धावा अशी झाली होती. पण,  रिषभ पंतने आक्रमक खेळी करून डाव सावरला. चेतेश्वर पुजाराची त्याला साथ मिळाली. पुजारा व श्रेयस अय्यर यांनी १४९ धावांची विक्रमी भागीदारी केली. पुजाराचे शतक हुकले, पण अय्यर अजूनही खेळपट्टीवर टिकून आहे. अय्यरला नशिबाची साथ मिळाली आणि चेंडू व बेल्स यांच्यात संपर्क होऊनही त्याची विकेट नाही पडली. त्याला जीवदान मिळाल्याने भारताचा माजी कसोटीपटू आकाश चोप्रा नाराज झाला आणि त्याने नियम बदलण्याची मागणी केली. 

शुबमन गिल ( २०), लोकेश राहुल ( २२) व  विराट कोहली ( १) हे तिघे फलकावर ४८ धावा असताना माघारी परतले.  रिषभ पंत व चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. पण, मेहिदी हसन मिराजने रिषभला ( ४६) माघारी जाण्यास भाग पाडले. रिषभच्या खेळीत ६ चौकार व २ षटकारांचा समावेश होता. रिषभने आजच्या सामन्यात दोन खणखणीत षटकार मारून कसोटीत पन्नास सिक्सचा विक्रम नावावर केला. भारताकडून कसोटीत सर्वात जलद ५० सिक्स मारण्याचा विक्रम त्याने त्याच्या नावावर नोंदवला.  

पुजाराने ७८वी धाव पूर्ण करताच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत आठवे स्थान पटकावले. त्याने दीलिप वेंगसरकरांचा विक्रम मोडला. पुजारा-श्रेयस यांच्या ३१७ चेंडूंत १४९ धावांच्या भागीदारीला तैजूल इस्लामची नजर लागली अन् पुजारा २०३ चेंडूंत ११ चौकारांसह ९० धावांवर बाद झाला. दिवसाच्या अखेरच्या षटकात अक्षर पटेल ( १३) LBW झाला अन् भारताच्या ६ बाद २७८ धावा झाल्या. अय्यर ८२ धावांवर नाबाद आहे.

अय्यर झाला होता बाद पण...
अय्यर ७८ धावांवर असताना इबादत होसैनच्या चेंडूने यष्टींचा वेध घेतला होता. चेंडू व यष्टी यांच्यात संपर्क झाला आणि बेल्सची लाईट पेटली. पण, बेल्स खाली न पडल्याने अय्यरला नाबाद दिले गेले. बांगलादेशचे खेळाडूही अचंबित झाले. यावरून आकाश चोप्राने लाईट पेटल्या तरीही आऊट दिले जावे अशी मागणी केली.  




सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs BAN 1st Test : Shreyas Iyer gets lucky as bails are not dislodged despite ball hitting the stumps, Aakash Chopre demand for change in rule 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.