India vs Bangladesh, 1st Test : वन डे मालिकेतील अपयश विसरून भारतीय संघ नव्या उम्मेदीनं कसोटी मालिकेत मैदानावर उतरला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करतोय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारताला महागात पडताना दिसतोय.. तैजूल इस्लामच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाज चाचपडले आणि आघाडीचे तिघेही माघारी परतले. विराट कोहलीची कसोटीतील निराशाजनक कामगिरी याही सामन्यात कायम राहिली आणि १ धाव करून तो बाद झाला. तैजूल इस्लामने ( Taijul Islam) अप्रतिम चेंडू टाकून विराटला अचंबित केले.
ट्वेंटी-२०मध्ये निराशा आता कसोटी वर्ल्ड कपमधून आशा! एक चूक अन् टीम इंडिया गमावेल ICC ट्रॉफी
शुबमन गिल व लोकेश राहुल ही जोडी सलामीला आली. पण, गिलला संधीचं सोनं करण्यात अपयश आलं. शुबमन गिल १४व्या षटकात तैजूल इस्लामच्या गोलंदाजीवर उगाच स्वीप मारायला गेला अन् पहिल्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या यासीर अलीने धावत जाऊन सोपा झेल टिपला. गिल २० धावांवर माघारी परतल्यानंतर बांगलादेशने सामन्यावर पकड घेण्यास सुरुवात केली. कर्णधार लोकेश खालेद अहमदच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. अहमदने टाकलेला चेंडू लोकेशच्या बॅटला लागून यष्टींवर आदळला अन् लोकेशलाही २२ धावांवर माघारी परतावे लागले. बांगलादेशमध्ये दुसरीच कसोटी खेळणारा विराट कोहली आज कसोटीतील शतकाचा दुष्काळ दूर करेल असे वाटले होते. पण, इस्लामच्या अप्रतिम वळणाऱ्या चेंडूवर विराट LBW झाला. १ धावा करून विराट माघारी परतला अन् भारताने ७ धावांच्या अंतराने तीन विकेट्स गमावल्या. बिनबाद ४१ वरून भारताची अवस्था ३ बाद ४८ अशी झाली. ( India vs Bangladesh Live Scorecard )
रिषभ पंत व चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला आणि पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ३ बाद ८५ धावा केल्या आहेत. रिषभने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४००० धावांचा टप्पाही ओलांडला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"