Ind vs Ban 1st test: बांगलादेशला धडा शिकवायला 'तो' येतोय.... स्टार खेळाडूचं होणार 'टीम इंडिया'मध्ये 'कमबॅक'

तब्बल ५ महिन्यांनी कसोटी संघात खेळणार हा खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 07:10 PM2022-12-11T19:10:11+5:302022-12-11T19:10:52+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Ban 1st test Team India all set to welcome back star all rounder Ravindra Jadeja in test team | Ind vs Ban 1st test: बांगलादेशला धडा शिकवायला 'तो' येतोय.... स्टार खेळाडूचं होणार 'टीम इंडिया'मध्ये 'कमबॅक'

Ind vs Ban 1st test: बांगलादेशला धडा शिकवायला 'तो' येतोय.... स्टार खेळाडूचं होणार 'टीम इंडिया'मध्ये 'कमबॅक'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh 1st Test: टीम इंडियाला आपल्या भूमीवर बोलावून बांगलादेशने त्यांचा चांगलाच पाहुणचार केला. वन डे मालिकेत बलाढ्य मानल्या जाणाऱ्या भारताला त्यांनी २-१ अशी धूळ चारली. आता भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना १४ डिसेंबरपासून येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू बांगलादेशी संघाला धडा शिकवण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाचा हा दिग्गज खेळाडू इतका धडाकेबाज आहे की तो एकहाती संपूर्ण बांगलादेशी संघाला अद्दल घडवू शकतो.

बांगलादेशी टायगर्सला धडा शिकवणार टीम इंडियाचा 'स्टार ऑलराऊंडर'

टीम इंडियाचा हा खेळाडू १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात संघात पुनरागमन करत आहे. हा खेळाडू दाखल होताच भारताची मैदानावरील ताकद नक्कीच वाढेल यात दुमत नाही. बांगलादेशी क्रिकेट संघाच्या कॅम्पमध्ये या खेळाडूसाठी खास प्लॅन बनवले जात असतील यातही काहीच वाद नाही. कारण हा खेळाडू म्हणजे दुसरा कोणी नसून 'टीम इंडिया'चा सर्वात मोठा मॅचविनर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रवींद्र जाडेजा मैदानात उतरणार आहे. काही काळापासून तो विविध कारणांमुळे क्रिकेटपासून दूर होता. पण रवींद्र जाडेजा तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे.

बांगलादेशच्या संघाचा कसोटीत लागणार कस

रवींद्र जाडेजा या वर्षी ऑगस्टमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तर रवींद्र जाडेजाने या वर्षी जुलैमध्ये बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. जाडेजा ५ महिन्यांनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणार आहे. रवींद्र जाडेजा धावा करण्याच्या बाबतीत आणि अष्टपैलू कामगिरी करण्याच्या बाबतीत किती सरस आहे हे चाहत्यांना सांगण्याची गरजच नाही. त्यातच, सध्याच्या घडीला भारतात युवा प्रतिभावान क्रिकेटपटूंमध्ये चुरस असल्याने जाडेजा मिळालेल्या संधीचे नक्कीच सोनं करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल यात वाद नाही. अशा परिस्थितीत तो १४ डिसेंबरपासून चितगाव येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशी संघाचा धुव्वा उडवण्यासाठी सज्ज आहे.

टीम इंडियाचा सर्वात धोकादायक खेळाडू

रवींद्र जाडेजा हा टीम इंडियाचा असा खेळाडू आहे, जो एकहाती कोणताही सामना फिरवू शकतो. रवींद्र जाडेजा फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात निष्णात आहे. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजा ७व्या क्रमांकावर फलंदाजीची भूमिका बजावेल असे वाटते. याशिवाय जाडेजा आपल्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षातील चपळाईदेखील दाखवण्यास उत्सुक असणार आहे. रवींद्र जाडेजाने आतापर्यंत ६० कसोटी सामन्यात २४२ विकेट घेतल्या असून २,५२३ धावा केल्या आहेत.

कसा आहे भारतीय संघ?

रोहित शर्मा (कर्णधार) / अभिमन्यू ईश्वरन, केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.  

Web Title: Ind vs Ban 1st test Team India all set to welcome back star all rounder Ravindra Jadeja in test team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.