India vs Bangladesh, 1st Test : कुलदीप यादवच्या पाच विकेट्स अन् ४० धावा अशा अष्टपैलू कामगिरीनंतर शुबमन गिल व चेतेश्वर पुजारा यांनी वैयक्तिक शतक झळकावले. भारताने पहिल्या डावातील २७४ धावसंख्येत २५८ धावांची अधिक भर घातली आणि बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानासमोर बांगलादेशचा संघ गंटांगळ्या खाईल असे वाटत होते, पण त्यांच्या ओपनर्सनी जबरदस्त खेळ केला. पण, लंच ब्रेकनंतर उमेश यादवने भारताला पहिली विकेट मिळवून दिली. विराट कोहलीकडून हा झेल सुटला होता, परंतु रिषभ पंतने चपळाई दाखवली अन् कॅच घेतली. लोकेश राहुलचा जीव भांड्यात पडला.
भारताच्या पहिल्या डावातील ४०४ धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर भारताने गुंडाळला. कुलदीपने १६-६-४०-५ अशी कामगिरी केली. मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या, तर उमेश यादव व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. फॉलो ऑन न देता फलंदाजीचा सराव मिळावा या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या
लोकेश राहुलला ( २३) पुन्हा अपयश आले. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी ११३ धावांची भागीदारी केली. शुभमनने १५२ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ११० धावा केल्या. पुजारानेही १३० चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने नाबाद १०२ धावा केल्या. भारताने दुसरा डाव २ बाद २५८ धावांवर घोषित करताना बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले.
बांगलादेशचे फलंदाज चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच गुडघे टेकतील असे वाटले होते. पण, जाकिर हसन व नजमूल शांतो यांनी दमदार खेळ केला. पण, लंच ब्रेकनंतर उमेश यादवने भारताला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. उमेशने टाकलेला बाहेर जाणारा चेंडूवर नजमूलने फटका मारला, पण तो स्लीपला उभ्या असलेल्या विराटच्या दिशेने गेला. विराटकडून हा झेल सुटलेला. यष्टिरक्षक रिषभने चपळाई दाखवून झेल टिपला अन् लोकेशचा जीव भांड्यात पडला. नजमूल व हसन यांनी पहिल्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केली. भारताविरुद्ध ही चौथ्या डावात सलामीवीरांची चौथी सर्वोत्तम भागीदारी ठरली. ( Highest 4th innings opening partnership against India) यापूर्वी ए रे व जे स्टो लमेयर ( वेस्ट इंडिज, १९५३) यांनी नाबाद १४२, एम हॉर्न-जी स्टीड ( न्यूझीलंड, १९९९) यांनी १३१ आणि जे बिंक्स-बी बोलूस ( इंग्लंड, १९६४) यांनी १२५ धावांची भागीदारी केली होती. ( India vs Bangladesh Live Scorecard )
अक्षर पटेलने दुसरा धक्का देताना यासीर अलीला ५ धावांवर त्रिफळाचीत केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs BAN 1st Test : Virat Kohli fumbles but Rishabh Pant takes the catch as Umesh Yadav provides the much needed breakthrough for India, Najmul Shanto departs, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.