Join us  

Virat Kohli, IND vs BAN: विराट कोहली बांगलादेश विरूद्धच्या मालिकेत जो रूटचा 'हा' विक्रम मोडेल?

Virat Kohli, India vs Bangladesh: १९ सप्टेंबरपासून चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर रंगणार पहिला भारत-बांगलादेश कसोटी सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 10:57 AM

Open in App

Virat Kohli, India vs Bangladesh: भारतीय संघ आता घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका (IND vs BAN Test Series) खेळणार आहे. पहिला सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळवला जाईल. तर दुसरा सामना २७ सप्टेंबरपासून सुरु होईल. या मालिकेत चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर विराट कोहली दमदार धावा करू शकतो. या मैदानावरील त्याची कामगिरी पाहता हा अंदाज लावला जाऊ शकतो. चेपॉकमध्ये कोहलीचा रेकॉर्ड चांगला आहे. त्यामुळे तो इंग्लंडचा फलंदाज जो रूटचा विक्रम नक्कीच मोडू शकतो.

विराट कोहली मोडणार का जो रूटचा विक्रम?

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम सुनील गावसकरच्या नावावर आहे. त्यांनी १२ सामन्यांत १,०१८ धावा केल्या आहेत. परदेशी खेळाडूंमध्ये इंग्लंडचा जो रूट आघाडीवर आहे. त्याने ३ सामन्यांत ३९१ धावा केल्या आहेत. या मैदानावर रूटच्या धावा कोहलीपेक्षाही जास्त आहेत. विराटने ४ कसोटींमध्ये ६ डावांत २६७ धावा केल्या आहेत. बांगलादेश विरुद्धच्या २ कसोटी सामन्यांच्या ४ डावात त्याने १२४ धावा केल्या तर तो जो रूटला मागे टाकू शकतो.

रोहितकडेही विक्रम करण्याची सुवर्णसंधी

रोहितने बांगलादेश विरूद्धच्या मालिकेत ७ षटकार मारले तर तो भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरेल. रोहित शर्मा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला मागे टाकेल. सेहवागने भारतासाठी १०३ कसोटींमध्ये ९० षटकार ठोकले आहेत. रोहितच्या नावावर आतापर्यंत ५९ कसोटी सामन्यात ८४ षटकार आहेत. या यादीत महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या, सचिन तेंडुलकर चौथ्या आणि रवींद्र जाडेजा पाचव्या स्थानावर आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशविराट कोहलीरोहित शर्माजो रूटविरेंद्र सेहवाग