Join us

Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?

Virat Kohli Rohit Sharma Team India, IND vs BAN 1st Test: टीम इंडियाचे स्टार विराट-रोहित दोघांनाही सराव सत्रात वेगळ्याच प्रकारची प्रक्टिस केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 19:03 IST

Open in App

Virat Kohli Rohit Sharma Team India, IND vs BAN 1st Test: बांगलादेशच्या संघाने कसोटी क्रिकेटमध्ये काही दिवसांपूर्वी मोठा उलटफेर केला. पाकिस्तानविरूद्ध त्यांनी पहिलीवहिली कसोटी मालिका जिंकली. त्यांनी २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना १० गडी राखून तर दुसरा सामना ६ गडी राखून खिशात घातला. बांगलादेशचा संघ आता १९ सप्टेंबरपासून भारतात २ कसोटींची मालिका खेळणार आहे. पाकिस्तानला त्यांच्याच घरात पराभूत करणाऱ्या बांगलादेश विरूद्ध रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या दिग्गजांनी कसोटी लागणार आहे. त्यामुळेच आज या दोन दिग्गजांनी वेगळ्या प्रकारे सराव केला.

सराव सत्रात नेट्समध्ये काय घडलं?

सोमवारी सराव सत्रात कोहली प्रथम फलंदाजीसाठी नेट्समध्ये आला. दोन्ही फलंदाजांनी बराच वेळ फलंदाजी केली. विराटने आज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन या दोघांसमोर कसून सराव केला. दुसरीकडे कर्णधार रोहितने फिरकी गोलंदाजांचा सामना केला. गेल्या तीन वर्षात रोहित ऑफ-स्पिनर्स आणि लेफ्ट आर्म स्पिनर्सविरुद्ध कसोटीत सातत्याने विकेट गमावत आहे. त्यामुळे बांगलादेशच्या आक्रमणाची ताकद लक्षात घेत दोन दिग्गजांनी सराव केला.

सरफराज पहिल्यांदाच नेट्समध्ये

टीम इंडियाने १३ सप्टेंबरपासून चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सराव सत्र सुरू केले. त्यात सर्व १६ खेळाडू पहिल्या दोन दिवस कॅम्पचा भाग नव्हते. युवा फलंदाज सरफराज खान दुलीप ट्रॉफीची दुसरी फेरी खेळण्यात व्यस्त होता. यानंतर सर्फराज चेन्नईला पोहोचला आणि सोमवारी त्याने प्रथमच सराव सत्रात भाग घेतला. यादरम्यान त्याला फिरकीपटूंचा सामना करण्याची संधी मिळाली.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्माजसप्रित बुमराहविराट कोहलीआर अश्विन