Join us  

IND vs BAN 2nd ODI Live : शिखर धवनने मांडीने कॅच पकडला; उम्रान मलिकने 151kmph च्या वेगाने स्टम्प उडवला, Video 

India vs Bangladesh 2nd ODI Live Updates :  रोहित शर्माला दुखापतीमुळे दुसऱ्याच षटकात मैदानाबाहेर गेल्यानंतर भारतीय संघावर दडपण येईल असे वाटले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 1:25 PM

Open in App

India vs Bangladesh 2nd ODI Live Updates :  रोहित शर्माला दुखापतीमुळे दुसऱ्याच षटकात मैदानाबाहेर गेल्यानंतर भारतीय संघावर दडपण येईल असे वाटले होते. पण, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी कमालीची कागमिरी करताना बंगलादेशला बॅकफूटवर फेकले आहे. शिखर धवनने ( Shikhar Dhawan) मजेशीर कॅच घेत प्रेक्षकांचे मनोरंजन केले...  बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने पुन्हा नाणेफेक जिंकली, परंतु यावेळी त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या संघात दोन बदल झाले आहेत. अक्षर पटेल व उम्रान मलिक यांची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली असून शाहबाद अहमद व कुलदीप सेन यांना बाहेर जावे लागले आहे. अनामुल हक व लिटन दास यांनी चांगली सुरुवात करून दिली. अनामुलने काही चांगले फटकेही मारले आणि ९ चेंडूंत ११ धावा केल्या. मोहम्मद सिराजने टाकलेल्या दुसऱ्या षटकात अनामुलने हे चौकार खेचले, परंतु चौथ्या चेंडूवर स्लीपमध्ये रोहितकडून त्याचा झेल सुटला.  चेंडू एवढ्या वेगाने रोहितच्या डाव्या हातावर आदळला की त्याला प्रचंड वेदना झाल्या आणि त्याने लगेच मैदानाबाहेर जाणे योग्य समजले. 

सिराजने पुढच्याच षटकात अनामुलला पायचीत केले खरे, परंतु रोहितच्या दुखापतीने सर्वांचे टेंशन वाढलेय. बीसीसीआयने दिलेल्या अपडेट्सनुसार रोहितला हाताचा स्कॅन करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. लोकेश राहुल प्रभारी कर्णधार म्हणून काम पाहतोय.. सिराजने बांगलादेशचा कर्णधार लिटन दास ( ७) याचा त्रिफळा उडवला. नजमूल शांतो ( २१) व शाकिब अल हसन ( ८) ही जोडी सेट होताना दिसत होती, परंत वॉशिंग्टन सुंदरने त्यांना माघारी पाठवले. सुंदरच्या चेंडूवर स्वीप मारण्याचा शाकिबचा प्रयत्न फसला.. सिराज व धवन झेल घेण्यासाठी पुढे आले अन् त्यांच्यात ताळमेळ चूकला... शाकिबला जीवदान मिळलाय असे वाटत असताना धवनने चेंडू मांडीच्या सहाय्याने टिपला अन् सुंदरच्या जीवात जीव आला. बांगलादेशचे ६ फलंदा ६९ धावांत माघारी परतले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशशिखर धवनवॉशिंग्टन सुंदर
Open in App