India vs Bangladesh 2nd ODI Live Updates : पहिल्या सामन्यात मार खाल्ल्यानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्याच्या निर्धाराने आज मैदानावर उतरणार आहे. त्यात दुखापतीचे ग्रहण काही केल्या पाठ सोडेना झालेय... पहिल्या वन डे आधी रिषभ पंतने मालिकेतून माघारी घेतली, तत्पूर्वी मोहम्मद शमी बाहेर झालाच होता.. अक्षर पटेललाही सराव सत्रात दुखापत झाल्याने पहिल्या सामन्यात त्याला खेळता आले नव्हते. शार्दूल ठाकूरलाही पहिल्या सामन्यात दुखापत झालीय आणि आज त्याची खेळण्याची शक्यता कमी होती, परंतु दुसऱ्याच खेळाडूला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे.
नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने; दोन बदलांसह टीम इंडिया मैदानावर
बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने पुन्हा नाणेफेक जिंकली, परंतु यावेळी त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या संघात दोन बदल झाले आहेत. अक्षर पटेल व उम्रान मलिक यांची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली असून शाहबाद अहमद व कुलदीप सेन यांना बाहेर जावे लागले आहे. कुलदीपने पहिल्या सामन्यातून वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि ३७ धावांत २ विकेट्स घेतल्या. पण, त्याच्या पाठ दुखावली गेली आणि बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला. त्यामुळे तो आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याचे रोहितने सांगितले.
- २२ ऑक्टोबर १९९६ साली मध्य प्रदेशमधील हरिहरपूर गावातील कुलदीपचा जन्म... त्याचे वडील सलून मध्ये काम करतात आणि ८ वर्षांपासून कुलदीपने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
- कुलदीप स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून व आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्सने २० लाखांत कुलदीपला आपल्या ताफ्यात घेतले. त्याने ७ सामन्यांत ८ विकेट्स घेतल्या
- १ नोव्हेंबर २०१८ मध्ये मध्य प्रदेश संघाकडून रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले. २१ नोव्हेंबर २०१८मध्ये त्याने पंजाबविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या. त्यानंतर सय्यद मुश्ताक आली आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतही त्याने आपला दम दाखवला. न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या ३ वन डे सामन्यांच्या मालिकेत तो भारत अ संघाचा सदस्य होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"