India vs Bangladesh 2nd ODI Live Updates : मोहम्मद सिराज, उम्रान मलिक आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी कमालीची कागमिरी करताना बंगलादेशला बॅकफूटवर फेकले होते. पण, मेहिदी हसन मिराज व महमदुल्लाह या बांगलादेशी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले... दुसऱ्या षटकात दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेलेला रोहित शर्मा ( Rohit Sharma) अंगठ्याला पट्टी बांधून हॉस्पिटलमधून परतला, पंरतु त्याची फलंदाजी करण्याची शक्यता कमीच आहे. त्यात आणखी एक भर पडली आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये असलेल्या गोलंदाजाने डग आऊटची वाट पकडली. त्याचा फायदा बांगलादेशच्या फलंदाजांनी उचलला आणि सातव्या विकेटसाठी १००+ धावांची भागीदारी केली आहे.
शिखर धवनने मांडीने कॅच पकडला; उम्रान मलिकने 151kmph च्या वेगाने स्टम्प उडवला, Video
अनामुल हक व लिटन दास यांनी चांगली सुरुवात करून दिली. अनामुलने काही चांगले फटकेही मारले आणि ९ चेंडूंत ११ धावा केल्या. मोहम्मद सिराजने टाकलेल्या दुसऱ्या षटकात अनामुलने हे चौकार खेचले, परंतु चौथ्या चेंडूवर स्लीपमध्ये रोहितकडून त्याचा झेल सुटला. चेंडू एवढ्या वेगाने रोहितच्या डाव्या हातावर आदळला की त्याला प्रचंड वेदना झाल्या आणि त्याने लगेच मैदानाबाहेर जाणे योग्य समजले. सिराजने पुढच्याच षटकात अनामुलला पायचीत केले खरे, परंतु रोहितच्या दुखापतीने सर्वांचे टेंशन वाढलेय.
बीसीसीआयने दिलेल्या अपडेट्सनुसार रोहितला हाताचा स्कॅन करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
लोकेश राहुल प्रभारी कर्णधार म्हणून काम पाहतोय.. सिराजने बांगलादेशचा कर्णधार लिटन दास ( ७) याचा त्रिफळा उडवला. नजमूल शांतो ( २१) व शाकिब अल हसन ( ८) ही जोडी सेट होताना दिसत होती, परंत वॉशिंग्टन सुंदरने त्यांना माघारी पाठवले. सुंदरच्या चेंडूवर स्वीप मारण्याचा शाकिबचा प्रयत्न फसला.. सिराज व धवन झेल घेण्यासाठी पुढे आले अन् त्यांच्यात ताळमेळ चूकला. शाकिबला जीवदान मिळलाय असे वाटत असताना धवनने चेंडू मांडीच्या सहाय्याने टिपला अन् सुंदरच्या जीवात जीव आला. बांगलादेशचे ६ फलंदाज ६९ धावांत माघारी परतले.
पहिल्या सामन्यातील नायक मेहिदी हसन मिराज याने पुन्हा एकदा भारताची डोकेदुखी वाढवली आणि यावेळेस त्याला महमदुल्लाहच्या अनुभवाची साथ मिळाली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १००+ धावा जोडल्या. रोहित शर्मा बोटाला पट्टी बांधून ड्रेसिंग रुममध्ये दिसला आणि त्यात दीपक चहरच्या मांडीचे स्नायू ताणले गेले. तो डग आऊटमध्ये जाऊन बसला आहे. त्याने केवळ ३ षटकं फेकली आहेत आणि तो नसल्याचा फायदा बांगलादेशला झाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs BAN 2nd ODI Live : Rohit Sharma has his thumb taped heavily. Highly likely we won't see him bat in this match or maybe in the series, Deepak Chahar has broken down it seems again
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.