India vs Bangladesh 2nd ODI Live Updates : पहिल्या वन डे आधी रिषभ पंतने मालिकेतून माघारी घेतली, तत्पूर्वी मोहम्मद शमी बाहेर झालाच होता. त्यात कुलदीप सेनची पाठ दुखायला लागली आणि तो दुसऱ्या वन डे सामन्यात खेळत नाहिय... त्यात भर पडली ती रोहित शर्माची ( Rohit Sharma)... दुसऱ्याच षटकात रोहितला मैदान सोडावे लागले आहे आणि आताच हाती आलेल्या बातमीनुसार त्याला हॉस्पिटलमध्या नेण्यात आले आहे.
बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने पुन्हा नाणेफेक जिंकली, परंतु यावेळी त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या संघात दोन बदल झाले आहेत. अक्षर पटेल व उम्रान मलिक यांची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली असून शाहबाद अहमद व कुलदीप सेन यांना बाहेर जावे लागले आहे. कुलदीपने पहिल्या सामन्यातून वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि ३७ धावांत २ विकेट्स घेतल्या. पण, त्याच्या पाठ दुखावली गेली आणि बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला.
अनामुल हक व लिटन दास यांनी चांगली सुरुवात करून दिली. अनामुलने काही चांगले फटकेही मारले आणि ९ चेंडूंत ११ धावा केल्या. मोहम्मद सिराजने टाकलेल्या दुसऱ्या षटकात अनामुलने हे चौकार खेचले, परंतु चौथ्या चेंडूवर स्लीपमध्ये रोहितकडून त्याचा झेल सुटला. चेंडू एवढ्या वेगाने रोहितच्या डाव्या हातावर आदळला की त्याला प्रचंड वेदना झाल्या आणि त्याने लगेच मैदानाबाहेर जाणे योग्य समजले. ड्रेसिंग रुममध्ये बसून तो मॅच पाहतोय... सिराजने पुढच्याच षटकात अनामुलला पायचीत केले खरे, परंतु रोहितच्या दुखापतीने सर्वांचे टेंशन वाढलेय. बीसीसीआयने दिलेल्या अपडेट्सनुसार रोहितला हाताला स्कॅन करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs BAN 2nd ODI Live : Update: India Captain Rohit Sharma suffered a blow to his thumb while fielding in the 2nd ODI. The BCCI Medical Team assessed him. He has now gone for scans.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.