India vs Bangladesh 2nd ODI Live Updates : बांगलादेश दौऱ्यावर जाणे भारताला चांगलेच महागात पडलेले दिसतेय. कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) च्या बोटाला दुखापत झाली आणि तो मालिकेलाच मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेहिदी हसन मिराज व महमदुल्लाह या बांगलादेशी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. ६ बाद ६९ धावांवरून त्यांनी संघाला २७० पार नेले आणि प्रत्युत्तरात भारताने तीन फलंदाज स्वस्तात गमावले. विराट कोहली बेक्कार पद्धतीने आऊट झाला.
मोहम्मद सिराज, उम्रान मलिक व वॉशिंग्टन सुंदर यांनी बांगलादेशची अवस्था दयनीय केली होती. अनामुल हक ( ११), लिटन दास ( ७), नजमूल शांतो ( २१), शाकिब अल हसन ( ८ ), मुश्फीकर रहिम ( १२) व आफिफ होसैन ( ०) हे सहा फलंदाज अवघ्या ६९ धावांवर माघारी परतले. दुसऱ्याच षटकात रोहित शर्माला स्लीपमध्ये झेल घेताना डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. तो आजची मॅच खेळण्याची शक्यता कमीच आहे.
रोहितच्या अनुपस्थितीत विराट कोहली व शिखर धवन ही जोडी सलामीला आली. विराटने चौकाराने खाते उघडले, परंतु इबादत होसैनच्या चेंडूवर पुल मारण्याच्या प्रयत्नात तो त्रिफळाचीत झाला. विराट ( ५), धवन ( ८) व वॉशिंग्टन सुंदर ( ११) माघारी परतल्याने भारताची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"