India vs Bangladesh, 2nd Test : भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी जबरदस्त कामगिरी केली. मोमिनूल हक वगळल्यास बांगलादेशच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर टीकता आले नाही. ५ बाद २१३ वरून बांगलादेशचा संपूर्ण संघ २२७ धावांवर तंबूत परतला. आर अश्विन व उमेश यादव यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या आणि भारताला कमबॅक करून दिले. (India vs Bangladesh Live ScoreCard )
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली तेव्हा बहुतेक चाहते थक्क झाले. टीम इंडियाने मागील सामन्यातील हिरो कुलदीप यादवला वगळले आणि त्याच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला ( Jaydev Unadkat) संधी दिली. जयदेव पूर्ण १२ वर्षे, २ दिवसांनंतर टीम इंडियाच्या टेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झाला. जयदेवने १६ डिसेंबर २०१० रोजी कसोटी पदार्पण केले आणि त्यानंतर तो आज मैदानावर उतरला. जयदेवने दुसरी कसोटी खेळण्यापूर्वी ११८ कसोटी सामन्यांना त्याला मुकावे लागले. दुसरी कसोटी खेळण्यासाठी कोणत्याही भारतीयाची ही सर्वात मोठी प्रतीक्षा आहे. लाला अमरनाथ यांच्या दोन कसोटी सामन्यांमधील अंतर हे १२ वर्ष व १२९ दिवसाचे होते. उनाडकटने १५व्या षटकात बांगलादेशला पहिला धक्का देताना जाकिर हसनला ( १५ ) माघारी पाठवले.
त्यानंतर आर अश्विनने सलामीवीर नजमूल शांतोला ( २४) पायचीत पकडले. शाकिब अल हसन ( १६), मुश्फिकर रहीम ( २६) आणि लिटन दास ( २५) हेही फार कमाल नाही करू शकले. उमेश यादव, उनाडकट व अश्विन यांनी या तिघांना बाद केले आणि बांगलादेशचा निम्मा संघ १७२ धावांत माघारी पाठवला. मोमिनूल हकने अर्धशतकी खेळी करताना एकट्याने खिंड लढवली. पण उमेश यादवने बांगलादेशला झटपट दोन धक्के देत मोमिनूला बॅकफूटवर फेकले. मोमिनूल व मेहिदी हसन मिराज यांची १०६ चेंडूंतील ४१ धावांची भागीदारी उमेशने तोडली. मेहिदी ( १५) व नुसूर हसन ( ६) यांना उमेशने बाद केले. मोमिनूल ८४ धावांवर अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला.