Join us  

KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठीही लोकेश राहुलवर मर्जी; सर्फराज खानला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी रिलीज करण्याबाबत सुरुये विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 3:12 PM

Open in App

Team India likely to release Sarfaraz Khan for Irani Cup: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत सर्फराज खानला प्लेइंग इलेव्हनमधील संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण त्याची टीम इंडियाच्या कसोटीतील संघातील निवड नावापुरतीच राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठीही लोकेश राहुलवरील मर्जी कायम ठेवत सर्फराज खानला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी रिलीज करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. 

टीम इंडियातून सर्फराज खानला करण्यात येणार रिलीज 

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार,  बीसीसीआय सर्फराज खानला १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान रंगणाऱ्या  इराणी चषक स्पर्धेसाठी भारतीय संघातून रिलीज करण्याचा विचार करत आहे.  जेणेकरून त्याला मुंबईच्या संघाकडून या स्पर्धेत खेळता येईल. त्यामुळेच दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याला संधी मिळणं कठीण असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात अखेरच्या क्षणी एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तरच त्याचा प्लेइंग इलेव्हनसाठी विचार होऊ शकतो. अन्यथा त्याला टीम इंडियातून रिलीज केले जाईल. 

सरर्फराजसंदर्भातील फायनल निर्णय कशावरून ठरणार?    

सूत्रांच्या हवाले दिलेल्या या वृत्तानुसार, बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे देखील सर्फराज खानला इराणी चषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रिलीज करायला तयार आहेत. सामन्याआधी नेट प्रॅक्टिसमध्ये कोणताही खेळाडूला दुखापत झाली नाही तर त्याला रिलीज करायला काहीच हरकत नाही, असे मत अजित आगरकर याचे आहे. 

घाई करण्याची गरज नाही

भारतीय संघ बांगलादेश विरुद्धचा दुसरा कसोटी सामना कानपूरच्या मैदानात खेळणार आहे. दुसरीकडे इराणी चषक स्पर्धेतील सामने हे लखनऊच्या मैदानात रंगणार आहेत. दोन्ही शहरातील अंतर अवघ्या तासाभराचे आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी आधी अखेरच्या टप्प्यातच सर्फराज खानसंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाईल, असे वाटते.

शेष भारत संघाविरुद्ध रंगणार मुंबईचा सामना इराणी चषक स्पर्धेतील सामने आधी मुंबईत खेळवण्यात येणार होते. पण ते आता लखनऊमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहेत. अंजिक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघाता सामना हा शेष भारत संघाविरुद्ध होणार आहे. मुंबईकडून श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूरसोबत  सर्फराज खानही या स्पर्धेत खेळताना दिसेल, असे चित्र आता निर्माण झाले आहे. 

टॅग्स :सर्फराज खानलोकेश राहुलभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ