कोलकाता : ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा १०६ धावांत खुर्दा उडवल्याचे पाहायला मिळाले. भारताकडून इशांत शर्माने सर्वाधिक पाच बळी मिळवले, त्याचबरोबर उमेश यादवने तीन आणि मोहम्मद शमीने दोन बळी पटकावले.
बांगलादेशच्या जखमी खेळाडूसाठी मैदानात धावत आले भारताचे डॉक्टर, पाहा नेमकं काय घडलं...खेळ भावना, नेमकी काय असते याचा उत्तम वस्तुपाठ भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यामधील ऐतिहासिक कसोटी सामन्यात पाहायला मिळाला. या सामन्यात बांगलादेशच्या एका खेळाडूला दुखापत झाली. या खेळाडूला तातडीने उपचार देण्यासाठी यावेळी बांगलादेशचा नाही तर भारताचा डॉक्टर मैदानात गेल्याचे पाहायला मिळाले. पण नेमकं घडलं तरी काय होतं...
ही गोष्ट २३व्या षटकात पाहायला मिळाली. हे षटक भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी टाकत होता. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ही घटना घडली. शमीने हा चेंडू बाऊन्सर टाकला. बांगलादेशच्या नईम हसनला या चेंडूचा समर्थपणे सामना करता आला नाही. हसन हा चेंडू खेळायला गेला आणि त्याला दुखापत झाली.
दुखापत झाल्यावर हसनने लगेच आपले हॅल्मेट काढले. त्यावेळी बांलादेशचे डॉक्टर मैदानात येणे अपेक्षित होते. पण यापूर्वी बांगलादेशच्या लिटन टासला दुखापत झाली होती. त्यामुळे बांगलादेशचे डॉक्टर त्याच्याबरोबर होते. ही गोष्ट जेव्हा भारताच्या संघाला समजली तेव्हा त्यांनी आपल्या संघाच्या डॉक्टरला मैदानात येण्याची विनंती केली. त्यावेळी भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल मैदानात धावत आले आणि त्यांनी हसनवर उपचार केल्याचे पाहायला मिळाले.
पहिल्या डे नाइट सामन्यात वृद्धिमान साहाने रचले अनोखे शतक; पाहा कोणता केला पराक्रमभारत विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये ऐतिहासिक सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यातत भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने इतिहास रचला आहे. पण त्याचबरोबर भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने एक पराक्रम केल्याचे पाहायला मिळाले आहे.
या सामन्यात इशांतच्या गोलंदाजीवर वृद्धिमानने एक अप्रतिम झेल टिपत बांगलादेशच्या महमुदुल्लाहाला बाद केले. हा झेल पकडल्यावर भारताचा कर्णधार विराट कोहलीही चांगलाच खूष झाल्याचे पाहायला मिळाले.
साहाने हा अप्रतिम झेल पकडला आणि तो कौतुकाचा धनी ठरला. पण या झेलबरोबर त्याले एक अनोखे शतकही साजरे केले. या झेलसह विकेट्स मागे शंभर बळी मिळवण्याचा पराक्रम साहाने यावेळी केला आहे.
ऐतिहासिक सामन्यात इशांत शर्माने रचला विक्रमभारत विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये पहिल्या डे नाइट कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने एक विक्रम रचल्याचे पाहायला मिळाले आहे.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत उपहारापर्यंत बांगलादेशच्या सहा फलंदाजांना ७३ धावांत गुंडाळल्याचे पाहायला मिळाले होते.
भारताच्या गोलंदाजांनी गुलाबी चेंडूच्या मदतीने अचूक आणि भेदक मारा करत बांगलादेशच्या फलंदाजांची फे फे उडवल्याचे पाहायला मिळाले. इशांत शर्माने या सामन्यात एक इतिहास रचल्याचे पाहायला मिळाले.
भारताला पहिल्या सहा षटकांमध्ये एकही यश मिळाले नव्हते. पण इशांतने सातव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बांगलादेशच्या इम्रुल कायेसला पायचीत पकडले आणि इतिहास रचला गेला. भारताकडून गुलाबी चेंडूने खेळताना पहिला बळी मिळवण्याचा मान इशांतला मिळाला आणि इतिहास रचला गेला.