IND vs BAN 2nd Test : मोठा धक्का! कसोटी वाचवण्याचा बांगलादेशचा प्रयत्न अन् कर्णधारासह प्रमुख गोलंदाजाची माघार 

India vs Bangladesh, 1st Test : पहिल्या कसोटीत भारताने विजयासाठी ठेवलेल्या ५१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान बांगलादेशला दोन दिवस संघर्ष करावा लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 10:25 AM2022-12-17T10:25:16+5:302022-12-17T10:26:02+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN 2nd Test : injured Captain Shakib Al Hasan and pacer Ebadot Hossain to not play in Mirpur Test vs India | IND vs BAN 2nd Test : मोठा धक्का! कसोटी वाचवण्याचा बांगलादेशचा प्रयत्न अन् कर्णधारासह प्रमुख गोलंदाजाची माघार 

IND vs BAN 2nd Test : मोठा धक्का! कसोटी वाचवण्याचा बांगलादेशचा प्रयत्न अन् कर्णधारासह प्रमुख गोलंदाजाची माघार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh, 1st Test : पहिल्या कसोटीत भारताने विजयासाठी ठेवलेल्या ५१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान बांगलादेशला दोन दिवस संघर्ष करावा लागणार आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला असून बांगलादेशने आतापर्यंत बिनबाद ९० धावा केल्या आहेत. एकीकडे ही कसोटी वाचवण्यासाठी बांगलादेशची धडपड सुरू असताना दुसरीकडे कर्णधार शाकिब अल हसन आणि गोलंदाज एबादत होसैन यांना दुखापतीने ग्रासले आहे. चट्टोग्राम येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत या दोघांनी दुसऱ्या डावात एकही षटक फेकले नव्हते आणि आता मिरपूर येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत त्यांच्या खेळण्याची शक्यता कमीच आहे.

कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळायचीय? ICC ने ठेवलं भारतासमोर आव्हानात्मक गणित

शाकिबला पहिल्या कसोटीपूर्वी सराव सत्रात दुखापत झाली होती आणि त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते, परंतु तरीही तो खेळला. पहिल्या डावात त्याने केवळ १२ षटकं फेकली. वन डे मालिकेत शाकिबच्या खांद्याला दुखापत झाली होती. पहिल्या कसोटीत तो खेळणार नव्हता, परंतु अखेरच्या मिनिटाला त्याने निर्णय बदलला. बांगलादेश क्रिकेट बार्डाचे अध्यक्ष नजमूल हसन यांनी त्याच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी कर्णधाराने पहिली कसोटीच खेळणार असे स्पष्ट सांगितले होते.  ( India vs Bangladesh Live Scorecard )

भारताच्या पहिल्या डावातील ४०४ धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर भारताने गुंडाळला.  कुलदीपने १६-६-४०-५ अशी कामगिरी केली. मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या, तर उमेश यादव व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. फॉलो ऑन न देता फलंदाजीचा सराव मिळावा या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या लोकेश राहुलला ( २३) पुन्हा अपयश आले. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी ११३ धावांची भागीदारी केली. शुभमनने १५२ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ११०  धावा केल्या. पुजारानेही १३० चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने नाबाद १०२ धावा केल्या.  भारताने दुसरा डाव २ बाद २५८ धावांवर घोषित करताना बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले.      
 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs BAN 2nd Test : injured Captain Shakib Al Hasan and pacer Ebadot Hossain to not play in Mirpur Test vs India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.