India vs Bangladesh, 2nd Test : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली तेव्हा बहुतेक चाहते थक्क झाले. टीम इंडियाने मागील सामन्यातील हिरो कुलदीप यादवला वगळले आणि त्याच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला ( Jaydev Unadkat) संधी दिल्याने चाहते आश्चर्यचकित झाले. जयदेव पूर्ण १२ वर्षे, २ दिवसांनंतर टीम इंडियाच्या टेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झाला आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जयदेवला दुसऱ्या टेस्टमध्ये भारताला पहिलं यश मिळालं आणि ही त्याची पहिली टेस्ट विकेट देखील होती.
८ विकेट्स अन् ४० धावा करणाऱ्या कुलदीप यादवला बाहेर का काढलं? लोकेश राहुलने कारण दिलं
जयदेवने १६ डिसेंबर २०१० रोजी कसोटी पदार्पण केले आणि त्यानंतर त्याची कधीही भारतीय कसोटी संघात निवड झाली नाही. जयदेव उनाडकटला १२ वर्षांनंतर संधी मिळाली आणि त्याच्या कारकिर्दीतील पहिला कसोटी बळीही मिळाला. जयदेवला कसोटी पदार्पणानंतर ४३८९ दिवसांनी पहिली विकेट मिळाली. याआधी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली कसोटी खेळली होती जिथे त्याला यश मिळाले नव्हते. जयदेवने या काळात भारतातील स्थानिक स्पर्धा गाजवल्या. रणजी करंडक स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांपैकी एक हा जयदेव आहे आणि त्याचं फळ त्याला उशीरा मिळाले. सोशल मीडियावर तो अधूनमधून भारतीय संघात संधी मिळत नसल्याची खंत व्यक्त करत होता. ( India vs Bangladesh Live ScoreCard )
बांगलादेशविरुद्धच्या दौऱ्यावर त्याची निवड झाली तेव्हाही व्हिसा न मिळाल्याने त्याला उशीर झाला अन् पहिल्या कसोटीला मुकला. पहिल्या कसोटीतील विजयानंतर भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल अपेक्षित नव्हता आणि त्यामुळे जयदेवची ही संधीही हुकणार अशीच शक्यता होती, पण त्याला अखेर संधी मिळाली.
उनाडकटचा ११८ कसोटींचा 'वनवास' संपलाजयदेवने दुसरी कसोटी खेळण्यापूर्वी ११८ कसोटी सामन्यांना त्याला मुकावे लागले. दुसरी कसोटी खेळण्यासाठी कोणत्याही भारतीयाची ही सर्वात मोठी प्रतीक्षा आहे. जयदेवच्या आधी दिनेश कार्तिकने ८७ कसोटी सामन्यांची प्रतीक्षा केली होती. लाला अमरनाथ यांच्या दोन कसोटी सामन्यांमधील अंतर हे १२ वर्ष व १२९ दिवसाचे होते.
२०१० मध्ये जेव्हा जयदेवने पहिली कसोटी खेळली तेव्हा विराट कोहलीने कसोटी पदार्पण केले नव्हते. त्याच वेळी, विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील प्लेइंग इलेव्हनचा एक भाग होता. बऱ्याच कालावधीनंतर जयदेवला दुसरी कसोटी खेळण्याची संधी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"