India vs Bangladesh 2nd Test Live Updates : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या कसोटीत विजय मिळवला आहे. आजपासून सुरू होणारी कसोटी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या दिशेने मोठं पाऊल टाकण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. पण पहिल्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करून मॅन ऑफ दी मॅच ठरलेल्या कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) याला बाकावर बसवल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कर्णधार लोकेशने यामागचं कारण सांगितले.
रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीत खेळेल अशी अपेक्षाही फोल ठरली. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात अंगठ्याला झालेली दुखापत अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही आणि त्यामुळे त्याने माघार घेतली. लोकेश आज खेळणार की नाही यावर साशंकता होती, परंतु लोकेश नाणेफेकीला आला अन् जीव भांड्यात पडला. पण, कुलदीप यादवला आजच्या सामन्यात बाकावर बसवण्यात आले. त्याच्या जागी जयदेव उनाडकतला संधी मिळाली. १२ वर्षांनंतर जयदेव भारताकडून कसोटी खेळणार आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारताचा संघ - शुभमन गिल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, आर अश्विन, जयदेव उनाडकत , उमेश यादव, मोहम्मद सिराज
लोकेश राहुल काय म्हणाला?
नाणेफेक जिंकून मीही फलंदाजी घेतली असती. खेळपट्टीवर खूपच गवत आहे, पण ही खेळपट्टी कन्फ्यूज करणारी आहे. त्यामुळे नाणेफेक गमावल्याने निराश नाही, कारण मलाच काही कळत नाही. मी कोचिंग स्टाफ आणि सीनियरचा सल्ला घेतला. आज जयदेव उनाडकत खेळणार आहे आणि कुलदीप यादवला बाहेर बसावे लागणार आहे. हा आव्हानात्मक निर्णय होता, परंतु अश्विन आणि अक्षर या खेळपट्टीवर चेंडू फिरवतील हा विश्वास आहे.
Web Title: IND vs BAN 2nd Test Live : No place for kuldeep yadav in the playing XI, he was player of the match in last match, KL Rahul give reason
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.