Ind Vs Ban 2nd Test: मेहदी हसन, शाकिबचा भेदक मारा, आघाडीचे चार फलंदाज बाद, मीरपूरमध्ये टीम इंडिया संकटात

Ind Vs Ban 2nd Test: मीरपूरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी बांगलादेशने दिलेल्या १४५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 04:25 PM2022-12-24T16:25:49+5:302022-12-24T16:32:41+5:30

whatsapp join usJoin us
Ind Vs Ban 2nd Test: Mehdi Hasan, Shakib's Penetrating Hit, Top Four Out, Team India In Trouble In Mirpur | Ind Vs Ban 2nd Test: मेहदी हसन, शाकिबचा भेदक मारा, आघाडीचे चार फलंदाज बाद, मीरपूरमध्ये टीम इंडिया संकटात

Ind Vs Ban 2nd Test: मेहदी हसन, शाकिबचा भेदक मारा, आघाडीचे चार फलंदाज बाद, मीरपूरमध्ये टीम इंडिया संकटात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सुरू असलेला दुसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. बांगलादेशने दिलेल्या १४५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. कर्णधार लोकेश राहुल (२), चेतेश्वर पुजारा (६), शुभमन गिल (७) आणि विराट कोहली (१) हे झटपट बाद झाल्याने  भारताची अवस्था बिकट झाली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ४  बाद ४५ धावांपर्यंत मजल मारली आहे. 

बंगलादेशचा दुसरा डाव २३१ धावांत गुंडाळल्यानंतर १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार लोकेश राहुल केवळ २ धावा काढून शाकिब अल हसनची शिकार झाला. तर मेहदी हसन मिराजने चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल आणि विराट कोहलीची विकेट काढत भारताला अडचणीत आणले. चौथ्या दिवस अखेर भारताने ४ बाद ४५ धावांपर्यंत मजल मारली आहे. अक्षर पटेल (२६) आणि जयदेव उनाडकट (३) खेळपट्टीवर आहेत. आता सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी १०० धावांची गरज असून, भारताच्या हातात ६ विकेट्स आहेत.

तत्पूर्वी बांगलादेशचा दुसरा डाव २३१ धावांवर आटोपला. कालच्या बिनबाद ७ धावांवरून पुढे खेळणाऱ्या बांगलादेशची तिसऱ्या दिवशी चांगली सुरुवात झाली नाही. सलामीवीर नजमुल हुसेन शंतो (५) आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला मोमिनूल हक (५) झटपट बाद झाले. त्यानंतर शकिब अल हसन (१३), मुशफिकूर रहिम (०) हेही बाद झाल्याने बांगलादेशची अवस्था ४ बाद ७० अशी झाली. यादरम्यान, झाकीर हसनने आपले अर्धशतक पूर्ण केलं. मात्र त्यानंतर झाकीर हसन ५१ धावा काढून बाद झाला. त्यानंतर बांगलादेशच्या डावाला पुन्हा गळती लागली. मेहदी हसन मिराज (०) आणि नुरूल हसन (३१) ठराविक अंतराने बाद झाल्याने बांगलादेशची अवस्था ७ बाद १५९ असी झाली.

मात्र एक बाजू लावून धरणाऱ्या लिटन दासने तळाच्या फलंदाजांसोबत चिवट फलंदाजी करत बांगलादेशला दोनशेपार पोहोचवले. लिटन दासने ७३ धावांची खेळी केली. अखेरीस बांगलादेशचा दुसरा डाव २३१ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून अक्षर पटेलने ३ तर मोहम्मद सिराज आणि अश्विनने प्रत्येकी दोन तर उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.  

Web Title: Ind Vs Ban 2nd Test: Mehdi Hasan, Shakib's Penetrating Hit, Top Four Out, Team India In Trouble In Mirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.