Join us  

IND vs BAN 2nd Test : मोठा धक्का, भारताच्या कसोटी संघात बदल; रोहित शर्माबाबत जय शाह यांनी केली घोषणा

India vs Bangladesh, 2nd Test: 22 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 1:39 PM

Open in App

India vs Bangladesh, 2nd Test: रोहित शर्माला ( Rohit Sharma) २२ डिसेंबरपासून मीरपूर येथे सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. BCCI ने आज अधिकृत घोषणा केली. रोहितसह जलदगती गोलंदाज नवदीप सैनी यालाही दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. चट्टोग्राममधील पहिल्या कसोटीला मुकलेला भारतीय कर्णधार आता ढाका येथे जाणार नाही. भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि शेवटच्या कसोटीत त्याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार लोकेश राहुल संघाचे नेतृत्व करेल.  

सूर्यकुमार यादवची 'रणजी'मध्ये जोरदार फटकेबाजी; १६ चेंडूंत चोपल्या ६६ धावा, पण थोडक्यात हुकले शतक

बांगलादेश दौऱ्यातील दुसऱ्या वन डे सामन्यादरम्यान दुखापत झालेला रोहितचा अंगठा पूर्ण बरा झालेला नाही आणि त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीतही खेळणार नाही. त्याचा अंगठा अजूनही दुखत आहे. भारतीय संघासमोरली पुढील आव्हानं लक्षात घेता बीसीसीआय, निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने या टप्प्यावर रोहितबाबत धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. नवदीप सैनीलाही दुखापतीमुळे खेळता येणार नाही तो आता NCA मध्ये दाखल होणार आहे.  

श्रीलंकेविरुद्ध ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी (तीन ट्वेंटी-२० आणि तीन वन डे सामने) तो उपलब्ध असेल अशी शक्यता आहे. रोहितने दुसऱ्या कसोटीतून माघार घेतल्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमीच आहे. लोकेश व शुबमन ही जोडी सलामीला खेळेल. गोलंदाजीत बदल झाल्यास जयदेव उनाडकतसाठी एकाला जागा रिक्त करावी लागेल. 

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ - लोकेश राहुल ( कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, केएस भरत, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू ईश्वरन, सौरभ कुमार, जयदेव उनाडकत ( India's updated squad for 2nd Test against Bangladesh: KL Rahul (C), Shubman Gill, Cheteshwar Pujara (VC), Virat Kohli, Shreyas Iyer, Rishabh Pant (WK), KS Bharat (WK), Ravichandran Ashwin, Axar Patel, Kuldeep Yadav, Shardul Thakur, Mohd. Siraj, Umesh Yadav, Abhimanyu Easwaran, Saurabh Kumar, Jaydev Unadkat

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्माबीसीसीआय
Open in App