IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

ind vs ban 2nd test live : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 05:43 PM2024-09-27T17:43:16+5:302024-09-27T17:44:05+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN 2nd Test Why Bangladesh fan Tiger Robi admitted to hospital Police gave important information | IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs BAN 2nd Test Match Live Updates | कानपूर : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस पाऊस एका चाहत्यामुळे चर्चेत राहिला. पावसाने केलेल्या बॅटिंगमुळे पहिल्या दिवसाचा खेळ पूर्ण होऊ शकला नाही. आजपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ ३५ षटकांचा खेळ झाला. बांगलादेशने ३ बाद १०७ धावा केल्या आहेत. खरे तर या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी काही हिंदू संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. बांगालादेशात हिंदूवर होत असलेल्या अन्यायाचा दाखला देत हिंदू महासभेने बांगलादेशविरुद्ध क्रिकेट खेळण्यास विरोध दर्शवला होता. कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर ही लढत पार पडत आहे. 

बांगलादेशचा एक चाहता अचानक आजारी पडला. आजारी पडताच पोलिसांनी त्याला उपचारासाठी वैद्यकीय पथकाकडे पाठवले. तो आता ठीक आहे. संबंधित चाहत्याला मारहाण झाल्याच्या बातम्या आल्या पण त्या निराधार आहेत. त्याच्यासोबत अशी कोणतीही घटना घडली नाही, अशी माहिती एसीपी अभिषेक पांडे यांनी दिली. एकूणच बांगलादेशचा सुपर फॅन म्हणून प्रसिद्ध असेलल्या टायगर रॉबीला मारहाण करण्यात आली असल्याचे वृत्त पोलिसांनी फेटाळले.

भारताचा संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

बांगलादेशचा संघ - नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमीनुल हक, मुशफिकर रहिम, शाकिब अल हसन, लिटन दास (यष्टिरक्षक), मेंहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खलेद अहमद. 

Web Title: IND vs BAN 2nd Test Why Bangladesh fan Tiger Robi admitted to hospital Police gave important information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.