India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: पहिल्या दोन सामन्यांत हार झाल्याने भारताने मालिका गमवाली आहे आणि आज अखेरच्या सामन्यात त्यांना उरलेली इभ्रत वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. रोहित शर्मा, दीपक चहर व कुलदीप सेन यांनी दुखापतीमुळे दुसऱ्या वन डे नंतर मालिकेतूनच माघार घेतली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात लोकेश राहुलला शिल्लक राहिलेल्या खेळाडूंसह आत्मविश्वास उंचावलेल्या बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे. बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
- बांगलादेशने घरच्या मैदानावर खेळलेल्या १४पैकी १३ द्विदेशीय मालिका जिंकल्या आहेत. इंग्लंडने २०१६मध्ये बांगलादेशला त्यांच्या घरच्या मैदानावर २-१ असे पराभूत केले होते.
- मेहिदी हसन मिराज हा भारताविरुद्धच्या मालिकेतील नायक ठरला आहे. त्याने २०२२ या वर्षात वन डे क्रिकेटमध्ये ८१.७५च्या सरासरीने धावा केल्या आहेत आणि २६.१३च्या सरासरीने गोलंदाजी केलीय.
- मोहम्मद सिराजने १६.२६च्या सरासरीने १५ विकेट्स घेतल्या आहेत. २०२२ या वर्षात वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या १० षटकांत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याने केलाय. ट्रेंट बोल्ट व मॅट हेन्री ( प्रत्येकी १० विकेट्स) हे संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत .
लिटन दासने सलग तिसऱ्या सामन्यात टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या संघात आज दोन बदल पाहायला मिळत आहेत. भारताच्या संघात रोहित शर्मा व दीपक चहर यांच्याजागी कुलदीप यादव व इशान किशन यांना संधी मिळाली आहे. ( Ishan Kishan and Kuldeep Yadav replace Rohit Sharma and Deepak Chahar.)
भारतीय संघ - इशान किशन, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, उम्रान मलिक
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"