IND vs BAN, 3rd ODI : इशान किशनने झळकावले वन डेतील सर्वात जलद द्विशतक! २३ चौकार, ९ षटकारांची आतषबाजी

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे इशान किशनने ( Ishan Kishan) आज दाखवून दिले. कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला अन् इशानची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 02:13 PM2022-12-10T14:13:32+5:302022-12-10T14:15:22+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN, 3rd ODI : Double hundred for Ishan Kishan from 126 balls, fastest ever in ODI history. | IND vs BAN, 3rd ODI : इशान किशनने झळकावले वन डेतील सर्वात जलद द्विशतक! २३ चौकार, ९ षटकारांची आतषबाजी

IND vs BAN, 3rd ODI : इशान किशनने झळकावले वन डेतील सर्वात जलद द्विशतक! २३ चौकार, ९ षटकारांची आतषबाजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे इशान किशनने ( Ishan Kishan) आज दाखवून दिले. कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला अन् इशानची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली. संघातील स्थान पक्के करण्याची हिच ती वेळ... असे मनाशी ठाम करून इशानने बांगलादेशच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. त्याने ८५ चेंडूंत वन डेतील तिच्या पहिले शतक पूर्ण केले आणि पुढे १५०+ धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी त्याने केवळ १८ चेंडू खेळले. त्यानंतरही इशानचा झंझावात कायम राहिला आणि त्याने द्विशतक झळकावून इतिहास घडविला. 

 इशान किशनची रेकॉर्ड ब्रेक खेळी; वीरेंद्र सेहवागचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडताना केले अनेक पराक्रम


इशान किशन व शिखर धवन ही जोडी सलामीला आली, परंतु बांगलादेशने पाचव्या षटकात धक्का दिला. धवन ३ धावांवर मेहिदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. विराट कोहली १ धावावर असताना लिटन दासने सोपा झेल सोडला. इशान व विराट यांनी त्यानंतर सावध खेळ करताना बांगलादेशच्या गोलंदाजांना आव्हान दिले.  इशान व विराट ही जोडी खेळपट्टीवर चांगली सेट झाली आणि या दोघांनी विक्रमी द्वितकी भागीदारी केली. 

वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या ३० षटकांत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये इशानने १७९* धावांसह दुसरे स्थान पटकावले. या विक्रमात ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज शेन वॉटसन ( १८५*  वि. बांगलादेश, २०११) अव्वल स्थानी आहे. क्विंटन डी कॉकने २०१६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६६ धावा केल्या होत्या आणि त्याआधी हर्षल गिब्सने २००६मध्ये ऑसींविरुद्ध १५६ धावा चोपल्या होत्या.  बांगलादेशमध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम इशानने नावावर करताना ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनचा ( १८५*) २०११ सालचा विक्रम मोडला. विराटने २०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध १८३ आणि लिटन दासने २०२०मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध १७६ धावा केल्या होत्या. 

प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम २६९* धावांचा विक्रम आज विराट व इशान या भारतीय जोडीने केला. यापूर्वी १९९८मध्ये सौरव गांगुली व सचिन तेंडुलकर यांनी श्रीलंकेविरुद्ध २५२ धावांची भागीदारी केली होती. इशानने १२६ चेंडूंत २३ चौकार व ९ षटकारांसह वन डे क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक पूर्ण केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs BAN, 3rd ODI : Double hundred for Ishan Kishan from 126 balls, fastest ever in ODI history.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.