India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: अखेरच्या सामन्यात त्यांना उरलेली इभ्रत वाचवण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने यजमान बांगलादेशच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. रोहित शर्मा जखमी झाल्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या इशान किशनने ( Ishan Kishan) विक्रमांचा पाऊस पडला. त्याने ८५ चेंडूंत वन डेतील तिच्या पहिले शतक पूर्ण केले आणि पुढे १५०+ धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी त्याने केवळ १८ चेंडू खेळले.
इशान किशन व शिखर धवन ही जोडी सलामीला आली, परंतु बांगलादेशने पाचव्या षटकात धक्का दिला. धवन ३ धावांवर मेहिदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. विराट कोहली १ धावावर असताना लिटन दासने सोपा झेल सोडला. इशान व विराट यांनी त्यानंतर सावध खेळ करताना बांगलादेशच्या गोलंदाजांना आव्हान दिले. बांगलादेशमध्ये वन डेत सलामीवीर म्हणून ५०+ धावा करणारा इशान हा दुसरा युवा भारतीय फलंदाज ठरल. गौतम गंभीरने २१ वर्ष व १८४ दिवसांचा असताना हा पराक्रम केला होता. इशान आता २४ वर्ष व १४५ दिवसांचा आहे आणि त्याने वीरेंद्र सेहवागचा ( २४ वर्ष व १७३ दिवस) विक्रम मोडला.
इशान व विराट ही जोडी खेळपट्टीवर चांगली सेट झाली आणि या दोघांनी विक्रमी शतकी भागीदारी केली. इशानने ८५ चेंडूंत वन डे तील पहिले शतक झळकावले. २००३ साली युवराज सिंगने बांगलादेशविरुद्ध पदार्पणाच्या डावात शतक झळकावले होते आणि त्यानंतर इशान हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. त्यानंतर पुढील १८ चेंडूंत इशानने १५०+ धावांचा टप्पा ओलांडला. भारताकडून सर्वात जलद १५० धावा करण्याचा विक्रम इशानने नावावर केला. त्याने १०३ चेंडूंत आज हा टप्पा ओलांडताना वीरेंद्र सेहवागचा २०११ साली ( ११२ चेंडू वि. वेस्ट इंडिज) नोंदवलेला विक्रम मोडला. रोहितने ११७ चेंडूंत ( वि. वेस्ट इंडिज, २०१८) व सचिन तेंडुलकर ११८ चेंडू ( वि. दक्षिण आफ्रिका, २०१०) चा सामना करताना हा विक्रम केला होता.
वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या ३० षटकांत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये इशानने १७९* धावांसह दुसरे स्थान पटकावले. या विक्रमात ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज शेन वॉटसन ( १८५* वि. बांगलादेश, २०११) अव्वल स्थानी आहे. क्विंटन डी कॉकने २०१६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६६ धावा केल्या होत्या आणि त्याआधी हर्षल गिब्सने २००६मध्ये ऑसींविरुद्ध १५६ धावा चोपल्या होत्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"