Join us  

IND vs BAN, 3rd ODI : इशान, विराट यांची वादळी खेळी; भारताच्या लक्ष्याच्या निम्म्या धावाही बांगलादेशला नाही करता आल्या

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: इशान किशन व विराट कोहली यांचे वादळ आज बांगलादेशमध्ये घोंगावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 6:40 PM

Open in App

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: इशान किशनविराट कोहली यांचे वादळ आज बांगलादेशमध्ये घोंगावले. रोहितच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या इशानने आज तुफान फटकेबाजी केली आणि टीम इंडियाने सहाव्यांदा  वन डे क्रिकेटमध्ये ४००+ धावांचा डोंगर उभा केला. ८ वर्षांनंतर भारताने  वन डेत एवढी मोठी धावसंख्या उभी केली आणि त्याचा भार बांगलादेशला पेलवला नाही. कसोटी खेळणाऱ्या देशाविरुद्ध भारताचा हा वन डे तील सर्वात मोठा विजय ठरला.  यापूर्वी २०१८मध्ये भारताने  २२४ धावांनी वेस्ट इंडिजला पराभूत केले होते. 

नाद खुळा! ३४ चेंडूंत १५६ धावांचा पाऊस; इशान किशन बनला जगातील युवा द्विशतकवीर, मोडले अनेक विक्रम 

इशान किशनचे ( Ishan Kishan) द्विशतक आणि विराट कोहलीच्या ( Virat Kohli) शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या वन डेत ८ बाद ४०९ धावांचा डोंगर उभा केला. इशान किशन व शिखर धवन ( ३) ही जोडी सलामीला आली. धवन माघारी परतल्यानंतर इशान व विराट यांनी १९० चेंडूंत २९० धावांची भागीदारी केली. इशान १३१ चेंडूंत २४ चौकार व १० षटकारांसह २१० धावांवर बाद झाला. विराटने ९१ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ११३ धावांवर माघारी परतला.  बांगलादेशमध्ये वन डे क्रिकेटमधील सर्वात्तम ४ बाद ३७० धावांचा ( २०११) विक्रम आज मोडला.  .  अनामुल हक ( ८) व कर्णधार लिटन दास ( २९) यांनी आश्वासक सुरुवात करून दिली होती खरी, परंतु अक्षर पटेलने त्याच्या पहिल्याच षटकात हकला बाद केले. त्यानंतर पटेलने बांगलादेशच्या मुश्फिकर रहिमला ( ७) बाद केले. मोहम्मद सिराजने कर्णधार दासचा अडथळा दूर केला आणि उम्रान मलिकने चौथा धक्का देताना यासीर अली ( २५) याला बाद केले. शाकिब अल हसन एकाकी खिंड लढवताना दिसला. पण, आज संधी मिळालेल्या कुलदीप यादवने ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. शाकिब ५० चेंडूंत ४ चौकारांसह ४३ धावांवर माघारी परतला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर व शार्दूल ठाकूर यांनीही धक्के दिले. शार्दूलने ३ विकेट्स घेतल्या. बांगलादेशचा संघ १८२ धावांत तंबूत परतला अन् भारताने २२७ धावांनी सामना जिंकला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशइशान किशनविराट कोहली
Open in App