Join us  

IND vs BAN, 3rd ODI : इशान किशनचे द्विशतक, विराटचे शतक! टीम इंडियाकडून व्याज वसूल, चोपल्या ४०० पार धावा

Ishan Kishan double century IND vs BAN 3rd ODI इशानने आज मिळालेल्या संधीचं सोनं केलं अन् सर्वात जलद द्विशतक झळकावले. इशानच्या विक्रमी कामगिरीनंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) शतक पूर्ण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 3:26 PM

Open in App

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: रोहित शर्मा दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेला नसता तर इशान किशनला ( Ishan Kishan) संधी मिळाली नसती अन् आज ज्या पद्धतीने तो खेळला ती फटकेबाजीही पाहता आली नसती. इशानने आज मिळालेल्या संधीचं सोनं केलं अन् सर्वात जलद द्विशतक झळकावले. इशानच्या विक्रमी कामगिरीनंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) शतक पूर्ण करताना १२०० दिवसांचा वन डे शतकाचा दुष्काळ संपवला. भारतीयांनी दोन सामन्यांतील पराभवाची आज व्याजासकट वसूली केली. विराट - इशान यांनी दुसऱ्या विकेटसाठी २९० धावांची विक्रमी भागीदारी करताना भारताला ४०० पार पल्ला पार करून दिला.

नाद खुळा! ३४ चेंडूंत १५६ धावांचा पाऊस; इशान किशन बनला जगातील युवा द्विशतकवीर, मोडले अनेक विक्रमइशान किशन व शिखर धवन ही जोडी सलामीला आली, परंतु बांगलादेशने पाचव्या षटकात धक्का दिला. धवन ३ धावांवर मेहिदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. विराट कोहली १ धावावर असताना लिटन दासने सोपा झेल सोडला. इशान व विराट यांनी त्यानंतर सावध खेळ करताना बांगलादेशच्या गोलंदाजांना आव्हान दिले. विराट व इशान यांनी १९० चेंडूंत २९० धावांची भागीदारी केली. इशानने १२६ चेंडूंत २३ चौकार व ९ षटकारांसह वन डे क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक पूर्ण केले.  

१२०० हून अधिक दिवसांनंतर विराट कोहलीने झळकावले वन डेत शतक; मोडला तेंडुलकर, पाँटिंगचा विक्रम 

 

विराटने ऑगस्ट २०१९नंतर वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावले. जवळपास १२०० हून अधिक दिवसानंतर विराटने शतक झळकावले आणि रिकी पाँटिंग व सचिन तेंडुलकर यांचे विक्रम मोडले. विराटचे हे वन डे क्रिकेटमधील ४४ वे शतक ठरले. त्याने सर्वात कमी २५६ डावांत ४४ शतक झळकावताना सचिन तेंडुलकरच्या ४१८ डावांत ४४ शतकांचा विक्रम मोडला. विराट ९१ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ११३ धावांवर माघारी परतला.  विराटचे हे ७२वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले आणि त्याने पाँटिंगला ( ७१) मागे टाकले.  इशान - विराट माघारी परतल्यावर भारताच्या धावगतीला लगाम लागली, परंतु संघाने वन डे क्रिकेटमध्या सहाव्यांदा ४०० + धावा केल्या. आफ्रिकेनेही सहा वेळा असा पराक्रम केला आहे. ८ वर्षांनंतर भारताने वन डे क्रिकेटमध्ये ४०० + धावा केल्या. 

भारताने बांगलादेशमध्ये वन डे क्रिकेटमधील सर्वात्तम ४ बाद ३७० धावांचा ( २०११) विक्रम आज मोडला. भारताने ८ बाद ४०९ धावा केल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशइशान किशनविराट कोहली
Open in App