India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: इशान किशनचे ( Ishan Kishan) द्विशतक आणि विराट कोहलीच्या ( Virat Kohli) शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या वन डेत ८ बाद ४०९ धावांचा डोंगर उभा केला. रोहित शर्मा दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेल्याने इशानला संधी मिळाली आणि त्याने दोन्ही हाताने त्यावर पकड मजबूत केली. सहकारी सरावासाठी नेट्समध्ये पोहोचण्यापूर्वीच इशान पोहोचला होता आणि त्याने नेट्समध्ये कसून सराव करत आज मैदान गाजवायचे हा निर्धार पक्का केला होता. त्याने त्याचा निर्धार खरा करून दाखवला.
इशान किशनचे द्विशतक, विराटचे शतक! टीम इंडियाकडून व्याज वसूल, चोपल्या ४०० पार धावा
इशान किशन व शिखर धवन ( ३) ही जोडी सलामीला आली. धवन माघारी परतल्यानंतर इशान व विराट यांनी १९० चेंडूंत २९० धावांची भागीदारी केली. इशानने १२६ चेंडूंत २३ चौकार व ९ षटकारांसह वन डे क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक पूर्ण केले. विराटने ऑगस्ट २०१९नंतर वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावले. विराटचे हे वन डे क्रिकेटमधील ४४ वे शतक ठरले. त्याने सर्वात कमी २५६ डावांत ४४ शतक झळकावताना सचिन तेंडुलकरच्या ४१८ डावांत ४४ शतकांचा विक्रम मोडला. विराट ९१ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ११३ धावांवर माघारी परतला.
इशान - विराट माघारी परतल्यावर भारताच्या धावगतीला लगाम लागली, परंतु संघाने वन डे क्रिकेटमध्या सहाव्यांदा ४०० + धावा केल्या. आफ्रिकेनेही सहा वेळा असा पराक्रम केला आहे. ८ वर्षांनंतर भारताने वन डे क्रिकेटमध्ये ४०० + धावा केल्या. भारताने बांगलादेशमध्ये वन डे क्रिकेटमधील सर्वात्तम ४ बाद ३७० धावांचा ( २०११) विक्रम आज मोडला. भारताने ८ बाद ४०९ धावांचा डोंगर उभा केला.
डाव संपल्यानंतर इशान म्हणाला, फलंदाजीसाठी ही खेळपट्टी पोषक आहे. मी फटकेबाजी करण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरलो होतो. आजच्या खेळीनंतर दिग्गजांमध्ये माझ्या नावाचा समावेश झाला, याचा मला आनंद आहे. माझ्या हातात १५ षटकं होती आणि मी ३०० धावाही करू शकलो असतो. विराट भाईसोबत फलंदाजी करताना मजा आली. मी ९५ धावांवर असताना षटकार मारण्याचे ठरवले होते. पण, विराट भाई म्हणाला तुझे हे पहिले शतक आहे त्यामुळे सांभाळून खेळ. या सामन्यापूर्वी मी सूर्यकुमार यादवशी चर्चा केली होती आणि त्याने मला सांगितले चेंडू नीट पाहा आणि फटका मार.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs BAN, 3rd ODI : Ishan Kishan today at the ground arrived an hour earlier than the rest of the team to practice and grab his opportunity, The results were - 210 in 131 balls with 24 fours and 10 sixes.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.