India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: इशान किशनचे ( Ishan Kishan) द्विशतक आणि विराट कोहलीच्या ( Virat Kohli) शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या वन डेत ८ बाद ४०९ धावांचा डोंगर उभा केला. रोहित शर्मा दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेल्याने इशानला संधी मिळाली आणि त्याने दोन्ही हाताने त्यावर पकड मजबूत केली. सहकारी सरावासाठी नेट्समध्ये पोहोचण्यापूर्वीच इशान पोहोचला होता आणि त्याने नेट्समध्ये कसून सराव करत आज मैदान गाजवायचे हा निर्धार पक्का केला होता. त्याने त्याचा निर्धार खरा करून दाखवला.
इशान किशनचे द्विशतक, विराटचे शतक! टीम इंडियाकडून व्याज वसूल, चोपल्या ४०० पार धावा
इशान किशन व शिखर धवन ( ३) ही जोडी सलामीला आली. धवन माघारी परतल्यानंतर इशान व विराट यांनी १९० चेंडूंत २९० धावांची भागीदारी केली. इशानने १२६ चेंडूंत २३ चौकार व ९ षटकारांसह वन डे क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक पूर्ण केले. विराटने ऑगस्ट २०१९नंतर वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावले. विराटचे हे वन डे क्रिकेटमधील ४४ वे शतक ठरले. त्याने सर्वात कमी २५६ डावांत ४४ शतक झळकावताना सचिन तेंडुलकरच्या ४१८ डावांत ४४ शतकांचा विक्रम मोडला. विराट ९१ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ११३ धावांवर माघारी परतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"