IND vs BAN, 3rd ODI : १२०० हून अधिक दिवसांनंतर विराट कोहलीने झळकावले वन डेत शतक; मोडला तेंडुलकर, पाँटिंगचा विक्रम 

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: इशानच्या विक्रमी कामगिरीनंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) शतक पूर्ण करताना ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 02:58 PM2022-12-10T14:58:20+5:302022-12-10T14:58:57+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN, 3rd ODI : Virat Kohli departs after scoring 113 in 91 balls with 11 fours and 2 sixes, 40 months drought in ODIs finally ended Kohli hits 72nd international century to surpass Ricky Ponting | IND vs BAN, 3rd ODI : १२०० हून अधिक दिवसांनंतर विराट कोहलीने झळकावले वन डेत शतक; मोडला तेंडुलकर, पाँटिंगचा विक्रम 

IND vs BAN, 3rd ODI : १२०० हून अधिक दिवसांनंतर विराट कोहलीने झळकावले वन डेत शतक; मोडला तेंडुलकर, पाँटिंगचा विक्रम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: रोहित शर्मा दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेला नसता तर इशान किशनला ( Ishan Kishan) संधी मिळाली नसती अन् आज ज्या पद्धतीने तो खेळला ती फटकेबाजीही पाहता आली नसती. इशानने आज मिळालेल्या संधीचं सोनं केलं अन् सर्वात जलद द्विशतक झळकावले. इशानच्या विक्रमी कामगिरीनंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) शतक पूर्ण करताना ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला.

नाद खुळा! ३४ चेंडूंत १५६ धावांचा पाऊस; इशान किशन बनला जगातील युवा द्विशतकवीर, मोडले अनेक विक्रम


इशान किशन व शिखर धवन ही जोडी सलामीला आली, परंतु बांगलादेशने पाचव्या षटकात धक्का दिला. धवन ३ धावांवर मेहिदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. विराट कोहली १ धावावर असताना लिटन दासने सोपा झेल सोडला. इशान व विराट यांनी त्यानंतर सावध खेळ करताना बांगलादेशच्या गोलंदाजांना आव्हान दिले. विराट व इशान यांनी १९० चेंडूंत २९० धावांची भागीदारी केली. इशानने १२६ चेंडूंत २३ चौकार व ९ षटकारांसह वन डे क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक पूर्ण केले. 

वन डे क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक ठरले आणि तो भारताकडून द्विशतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरला.  इशान हा वन डे त द्विशतक झळकावणारा युवा फलंदाज ठरला. त्याने २४ व र्ष व १४५ दिवसांचा असताना हा पराक्रम करताना रोहितचा ( २६ वर्ष व १८६ दिवस) विक्रम मोडला. इशान १३१ चेंडूंत २४ चौकार व १० षटकारांसह २१० धावांवर बाद झाला.  


विराटने ऑगस्ट २०१९नंतर वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावले. जवळपास १२०० हून अधिक दिवसानंतर विराटने शतक झळकावले आणि रिकी पाँटिंग व सचिन तेंडुलकर यांचे विक्रम मोडले. विराटचे हे वन डे क्रिकेटमधील ४४ वे शतक ठरले. त्याने सर्वात कमी २५६ डावांत ४४ शतक झळकावताना सचिन तेंडुलकरच्या ४१८ डावांत ४४ शतकांचा विक्रम मोडला. विराट ९१ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ११३ धावांवर माघारी परतला.  विराटचे हे ७२वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले आणि त्याने पाँटिंगला ( ७१) मागे टाकले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs BAN, 3rd ODI : Virat Kohli departs after scoring 113 in 91 balls with 11 fours and 2 sixes, 40 months drought in ODIs finally ended Kohli hits 72nd international century to surpass Ricky Ponting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.