ind vs ban 1st test match live updates | चेन्नई : पहिल्या सामन्यातील पहिले तीन दिवस भारतीय संघाने गाजवले. प्रथम फलंदाजी करताना ३७६ धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात ४ बाद २८७ धावा करुन भारताने डाव घोषित केला. खरे तर बांगलादेशने आपल्या पहिल्या डावात अवघ्या १४९ धावा केल्याने भारताला मजबूत आघाडी मिळाली. त्यामुळे बांगलादेशसमोर विजयासाठी ५१५ धावांचे विशाल लक्ष्य आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सलामीचा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर होत आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला अन् बांगलादेशने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. शाकिब अल हसन आणि कर्णधार नजमुल हुसैन शांतो या जोडीने भारतीय गोलंदाजांना आव्हान दिले. पण, आर अश्विनने शाकिबला बाहेरचा रस्ता दाखवून बांगलादेशला पाचवा झटका दिला, त्यानंतर लगेचच रवींद्र जडेजाने लिटन दासला बाद केले. मग पुन्हा अश्विनने मेहदी हसनला बाद करुन पाहुण्या संघाला सातवा झटका दिला. यासह अश्विनने दुसऱ्या डावात आपले पाच बळी पूर्ण केले. मग ५९व्या षटकात बांगलादेशकडून किल्ला लढवणारा शांतो बाद झाला, त्याला जडेजाने पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
आपल्या दुसऱ्या डावात ५१५ धावांच्या विशाल आव्हानापर्यंत पोहोचण्यासाठी बांगलादेशला एका चमत्काराची गरज होती. पण, आर अश्विन असताना चमत्कार होईल तो कसा... तिसऱ्या दिवसअखेर बांगलादेशने साजेशी कामगिरी केली होती. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला शाकिब अल हसन आणि कर्णधार नजमुल शांतो यांनी डाव सावरला. पण, आर अश्विन पुन्हा एकदा त्यांच्यासाठी काळ ठरला. त्याने शाकिबला बाद करताच जड्डूने लिटन दास आणि पुढच्या फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. या डावात अश्विनने सर्वाधिक सहा बळी घेतले, तर जडेजाला (३) आणि बुमराहला एक बळी घेता आला.
Web Title: IND vs BAN 4th Day Live R Ashwin dismisses Shakib Al Hasan and Ravindra Jadeja dismisses Liton Das
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.