IND vs BAN : वन डे नंतर बांगलादेशने मिशन कसोटी! जाहीर केला तगडा संघ, भारताचा WTCFinalचा रोखणार मार्ग

वन डे मालिकेनंतर भारत-बांगलादेश ( India vs Bangladesh) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे, जी भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 03:40 PM2022-12-08T15:40:35+5:302022-12-08T15:40:53+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN : Bangladesh announce 1st Test squad for India series, Bangladesh Mission Test after one day, India's way to block WTCFinal | IND vs BAN : वन डे नंतर बांगलादेशने मिशन कसोटी! जाहीर केला तगडा संघ, भारताचा WTCFinalचा रोखणार मार्ग

IND vs BAN : वन डे नंतर बांगलादेशने मिशन कसोटी! जाहीर केला तगडा संघ, भारताचा WTCFinalचा रोखणार मार्ग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Bangladesh announce 1st Test squad for India series - बांगलादेशने वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे आणि भारताविरुद्धचा अखेरचा वन डे सामना शनिवारी होणार आहे. वन डे मालिकेनंतर भारत-बांगलादेश ( India vs Bangladesh) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे, जी भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पण,बांगलादेशने घरच्या मैदानावर ज्याप्रकारे वर्चस्व गाजवले आहे, ते पाहता भारताला कसोटी मालिका सोपी नक्कीच जाणार नाही. त्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma) च्या खेळण्यावरही अनिश्चितता आहे.

दुसऱ्या वन डे सामन्यात रोहितला दुखापत झाली आणि तो मुंबईला परतला. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर रोहित पुढील निर्णय घेईल. मोहम्मद शमी, रिषभ पंत यांचेही कसोटी मालिकेत खेळणे अवघडच आहे. बांगलादेशने १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी आज संघ जाहीर केला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या शर्यतीत ऑस्ट्रेलिायपाठोपाठ भारत आघाडीवर आहे.सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये भारताला आणखी सहा सामने खेळायचे आहेत. बांगलादेश दौऱ्यावर दोन कसोटी सामने होतील, त्यानंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामने खेळायला भारत दौऱ्यावर येईल. सध्या, भारत ५२.०८ टक्केवारीसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका ५३.३३ च्या विजयाच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे.

पाकिस्तानला घरच्या मैदानावर इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला आणि भारताला आता बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करून अंतिम फेरीत पाऊल टाकण्याची संधी आहे. त्याचवेळी, भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर एकच कसोटी जिंकावी लागणार आहे. 

बांगलादेशचा कसोटी संघ ( पहिल्या सामन्यासाठी) - महमुदूल हसन जॉयन, नजमूल होसैन शांतो, मोमिूनल , जाकारी होसैन, यासीर अली, मुश्फिकर रहिम, शाकिब अल हसन , लिटन दास, सोहन, मेहिदी हसन, तज्जूल, तस्किन अहमद, खालेद, इबादत होसैन, शॉरिफुल, रेजौल इस्लाम, अनामुल हक ( SQUAD: Mahmudul Hasan Joy, Nazmul Hossain Shanto, Mominul, Jakir Hossain, Yasir Ali, Mushfiqur, Shakib, Litton, Sohan, Mehidy Hasan, Taijul, Taskin, Khaled, Ebadot, Shoriful, Rejaul Islam, Anamul Haque.)

कसोटी मालिका

पहिली कसोटी - १४ ते १८ डिसेंबर, चत्तोग्राम
दुसरी कसोटी - २२ ते  २६ डिसेंबर, ढाका

भारताचा कसोटी संघ -  रोहित शर्मा, लोकेश राहुल, आर अश्विन, केएस भरत, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, रिषभ पंत, अक्षर पटेल, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, उमेश यादव

कसोटीचे सामने सकाळी ९ पाहून खेळवण्यात येतील. सोन स्पोर्ट्स वर ही मालिका पाहता येणार आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs BAN : Bangladesh announce 1st Test squad for India series, Bangladesh Mission Test after one day, India's way to block WTCFinal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.