भारतीय संघ बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयार आहे. पहिल्या कसोटी सामन्याआधी बांगलादेशच्या ताफ्यातील ६ फूट २ इंच उंचीच्या तगड्या गोलंदाजाने 'गुरगुर' करत टीम इंडियाताल चॅलेंज दिले आहे. भारत दौऱ्यावर येण्याआधी बांगलादेशच्या संघाने पाकिस्तानच्या संघाला त्यांच्या घरातील कसोटी सामन्यात २-० अशी मात दिली होती. या मालिकेत बांगलादेशचा जलदगती गोलंदाज नाहिद राणा (Nahid Rana) यानं संघाच्या विजायात मोलाचा वाटा उचलला होता. या गोलंदाजानं आता भारताविरुद्धच्या मालिकेसाठी मैदानात उतरण्यापूर्वी माइंडगेम सुरु केला आहे.
१५० kmph वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता६ फूट २ इंच उंची असणारा हा २१ वर्षीय गोलंदाज सातत्याने जवळपास १५० kmph वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता बाळगून आहे. बांगलादेश क्रिकेटनं आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन (पूर्वीचे ट्विटर) एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात नाहिद राणा म्हणतोय की, "निश्चितच आम्ही भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयार आहोत. आम्ही सरावही सुरु केला आहे. आम्ही जेवढी प्रॅक्टिस करु तेवढ्या नेटानं आम्ही मैदानात उतरू. भारतीय संघ सर्वोत्तम आहे. पण जो संघ चांगला खेळ करेल, त्याल विजय. मिळवेल."
श्रीलंकेविरुद्ध पदार्पण, पाकिस्तानविरुद्ध धमाका
राणानं यावर्षी मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बांगलादेशकडून पदार्पण केले होते. १५० kmph वेगानं चेंडू टाकूनच त्यानं सर्वांच लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आता पाकिस्तान विरुद्धच्या रावळपिंडी कसोटीत त्याने सर्वोत्तम कामगिरीचीही नोंद केली. पाकिस्तान दौऱ्यात अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी झाली. भारताविरुद्धही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन, असे या गोलंदाजानं म्हटलं आहे.
स्पीडपेक्षा संघाच्या रणनितीप्रमाणे गोलंदाजी करण्यावर फोकस
चेन्नईच्या खेळपट्टीवर चेंडूलाचा चांगली उसळी मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत १५२ kmph चा आकडा गाठण्याचे ध्येय आहे का? असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला होता. यावर स्पीडवर कोणतीही भविष्यवाणी करता येत नाही, असे त्याने म्हटले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या तगड्या बॅटिंग लाईनसमोर त्याची खरी कसोटी असणार आहे.