चेन्नई येथे सुरू असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. पण दुसऱ्या बाजूला कर्णधार रोहित शर्मा दोन्ही सामन्यात फ्लॉप ठरला. बांगलादेश विरुद्धच्या खराब कामगिरीचा त्याचा सिलसिला पाहून अनेक चाहते त्याला ट्रोलही करत आहेत. त्यात आता रोहित शर्माचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. ज्यात तो भर मैदानात खेळाडूवर भडकल्याचे दिसून येते.
खेळाडूचं कॅप्टनकडे नाही लक्ष; रोहित जाम भडकला!
चेपॉकच्या मैदानात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाच्या खेळात बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांत खल्लास केला. बांगलादेशच्या डावात रोहित शर्मा आपल्या खेळाडूला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण संबंधित खेळाडूच आपल्या कॅप्टनकडे लक्ष नव्हते. मग रोहित हात उंचावत त्या खेळाडूवर राग व्यक्त करताना दिसून आले.
'सोए हुए हैं सब लोग!'; स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाले रोहितचे ते 'बोल'
सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो प्रकार कर्णधार रोहित शर्मा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना घडला. त्यावेळी संघातील खेळाडूचं कॅप्टन हातवारे करून फिल्ड प्लेसमेंट बदलण्याचा इशारा करतोय त्याकडे लक्ष नव्हते. यावर निराश होतरोहित शर्मा 'सोए हुए हैं सब लोग!' (सगळे झोपेत आहेत?) अशा शब्दांत भडकल्याचे दिसते. त्याचे हे शब्द स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाले आहेत. आता हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय.
रोहितचा दोन्ही डावात फ्लॉप शो!
बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत रोहितला लोकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. आतापर्यंत बांगलादेश विरुद्ध खेळलेल्या ३ कसोटी सामन्यात रोहितच्या खात्यात फक्त ३३ धावा जमा होत्या. यावेळी तो ही उणीव भरून काढेल, अशी अपेक्षा होती. पण रोहित शर्मा पुन्हा फ्लॉप ठरला. पहिल्या डावात ६ धावांवर बाद झालेल्या रोहितला दुसऱ्या डावतही दुहेरी आकडा गाठता आला नाही. तो ५ धावा करून तंबूत परतला. आतापर्यंतच्या बांगलादेश विरुद्धच्या ४ कसोटी सामन्यात त्याने फक्त ४४ धावा केल्या आहेत.