IND vs BAN : मी पहिली वन डे खेळणार कशी? Deepak Chahar बांगलादेशला पोहोचला, पण सोबत विचित्रच घडले अन्...

India vs Bangladesh : पहिल्या वन डे सामन्यापूर्वी भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीने दुखापतीमुळे माघार घेतली आणि त्याच्याजागी उम्रान मलिकची संघात एन्ट्री झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 11:14 AM2022-12-03T11:14:40+5:302022-12-03T11:15:28+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN : Deepak Chahar reaches Dhaka but without luggage, slams ‘Malaysian Airlines for poor service’ asks how he play 1st ODI  | IND vs BAN : मी पहिली वन डे खेळणार कशी? Deepak Chahar बांगलादेशला पोहोचला, पण सोबत विचित्रच घडले अन्...

IND vs BAN : मी पहिली वन डे खेळणार कशी? Deepak Chahar बांगलादेशला पोहोचला, पण सोबत विचित्रच घडले अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh : पहिल्या वन डे सामन्यापूर्वी भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीने दुखापतीमुळे माघार घेतली आणि त्याच्याजागी उम्रान मलिकची संघात एन्ट्री झाली. हे सर्व सुरळीत होतंय असे वाटत असताना टीम इंडियाची चिंता वाढवणारी गोष्ट समोर आली. भारताचा दुसरा गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) याला विचित्र अनुभव आला आणि त्या आता पहिली वन डे खेळणार कशी? असा सवालच केला... 

रोहित शर्मा-विराट कोहली यांच्यातला वाद खरा? रवी शास्त्रींच्या वक्तव्याने उडाली खळबळ; म्हणाले...

मोहम्मद शमीची माघार अन्..
उद्या सामना अन् आज मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) मालिकेतून माघार घेतल्याची बातमी आली.  सराव सत्र सुरू असताना शमीच्या खांद्याला दुखापत झाली आणि तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमच्या देखरेखीखाली उपचार घेतोय. त्यामुळे शमी तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत खेळणार नसल्याचे BCCI ने सांगितले आणि त्याच्याजागी उम्रान मलिकची वन डे संघात निवड झाली आहे.  

    
दीपक चहरसोबत काय घडलं?
बांगलादेश दौऱ्यासाठी दीपक चहर मलेशियन एअरलाईन्सने ढाका येथे दखल झाला, परंतु त्याचं लगेज पोहोचले नाही. चहरने ट्विट करून मलेशियन एअरलाईन्सला धारेवर धरले आणि त्यांच्या खराब सेवेबाबत बोल सुनावले. पण, या चुकीमुळे आता दीपक चहर पहिल्या वन डे ला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चहरने ट्विट केले की, मलेशिया एअरलाईन्ससह प्रवास करण्याचा अनुभव वाईट होता. प्रथम त्यांनी आम्हाला न सांगता आमची फ्लाइट बदलली आणि बिझनेस क्लासमध्ये जेवण नाही. आता आम्ही गेल्या २४ तासांपासून आमच्या सामानाची वाट पाहत आहोत .कल्पना करा की आम्हाला उद्या एक खेळ खेळायचा आहे.  

भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, उम्रान मलिक, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल. 

बांगलादेशचा वनडे संघ - लिटन दास (कर्णधार), अनामूल हक, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहिम, नझमुल हुसैन शांतो, महमुदुल्लाह, नुरूल हसन, अफिफ हुसैन, यासिर अली, मेहदी हसन, मुस्तफिझूर रहमान, हसन महमूद, इबादोत हुसैन, नसुम अहमद, महमुदुल्ला. 

वन डे मालिकेचे वेळात्रक
पहिली वन डे - ४ डिसेंबर - ढाका
दुसरी वन डे - ७ डिसेंबर- ढाका
तिसरी वन डे - १० डिसेंबर - चत्ताग्राम
 
वन डे मालिकेचे सामने सकाळी ११.३० वाजल्यापासून सुरू होतील, तर कसोटीचे सामने सकाळी ९ पाहून खेळवण्यात येतील. सोन स्पोर्ट्स वर ही मालिका पाहता येणार आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: IND vs BAN : Deepak Chahar reaches Dhaka but without luggage, slams ‘Malaysian Airlines for poor service’ asks how he play 1st ODI 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.